अतिरिक्त साधनसंपत्तीची विकासासाठी उभारणी - मुख्यमंत्री 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 30 जानेवारी 2018

मुंबई -  राज्य सरकारने अनेक पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे हाती घेतली असून या सर्व विकासकामांना गती देण्यासाठी अतिरिक्त साधन संपत्तीची उभारणी करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सांगितले. 

राज्याच्या अतिरिक्त साधनसंपत्ती उभारणीबाबत आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती, त्या वेळी ते बोलत होते. बैठकीस वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव सुमित मलिक, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दिनेशकुमार जैन, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

सिडको, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण, म्हाडा, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ, बांधकाम कल्याण कामगार मंडळ, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांसह इतर मंडळे, महामंडळे आणि प्राधिकरणाकडील अतिरिक्त निधी राज्य शासनाच्या कर्जरोख्यात गुंतवल्यास राज्य शासन, महामंडळे आणि मंडळे या दोघांनाही फायदा आहे. या निधीवर महामंडळे, मंडळे आणि प्राधिकरणाचाच अधिकार राहील, त्यांना पाहिजे त्या वेळी त्यांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही मुख्यमंत्री या वेळी म्हणाले.

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: marathi news maharashtra news maharashtra Chief Minister Construction for additional resources