शैक्षणिक सवलत, वसतीगृहे, कौशल्य विकासासह बहुतांश मागण्या मान्य

Maratha Kranti Morcha Mumbai Morcha Chief Minister on Demands
Maratha Kranti Morcha Mumbai Morcha Chief Minister on Demands

मुंबई : लाखोंच्या संख्येने निघालेल्या राजधानी मुंबईत निघालेल्या मराठा क्रांती मोर्चातील बहुतांश मागण्या सरकारकडून आज (बुधवार) करण्यात आल्या. त्यामुळे आंदोलकांनी आनंद साजरा केला; मात्र, विरोधी पक्षांकडून सरकारने कोणतेही ठोस आश्वासन दिले नसल्याचे म्हणत नाराजी दर्शविली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत शेतकऱ्यांच्या 3 लाख मुलांना केंद्र शासनाच्या कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्याच्या घोषणेचा समावेश आहे. त्यासाठी 450 कोटीची तरतूद केली जाईल. तसेच प्रशिक्षित मुलांना रोजगार सुरू करण्यासाठी 10 लाख रुपयांचे कर्ज देण्यात येईल व त्याचे व्याज महामंडळामार्फत भरण्यात येईल.

मराठा समाजाला इतर मागास वर्गाला मिळणाऱ्या शैक्षणिक सवलती त्याच अटींच्या अधीन राहून मराठा समाजाला देण्यात येतील. त्यामध्ये 605 अभ्यासक्रमांचा समावेश असेल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

मराठा समाजास आरक्षण देण्याबाबतचा प्रस्ताव मागासवर्ग आयोगाकडे पाठविला आहे. आयोगाचे काम करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक करण्यात आली आहे. आयोगाला सर्व सोयीसुविधा पुरविण्यात आल्या आहेत. विहित कालमर्यादेत अहवाल देण्याबाबत त्यांना कळविण्यात येईल. तसेच रक्ताच्या नात्यामध्ये एका व्यक्तीची जातवैधता पडताळणी झाल्यानंतर कुटुंबातील इतर सदस्याला पुन्हा जातपडताळणीसाठी जावे लागणार नाही असा कायदा लवकरच आणत आहोत, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.

सरकारने मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसली. सरकारकडून कोणतेही ठोस आश्वासन दिलेले नाही.
- अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह अन्य मागण्यांसाठी मराठा क्रांतीमोर्चा आज भायखळा येथून आझाद मैदानपर्यंत काढण्यात आला होता. त्यानंतर मोर्च्यातील शिष्टमंडळाने विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मराठा समाजाच्या विविध मागण्या मांडल्या.

या शिष्टमंडळाशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात शासनाची सकारात्मक भूमिका आहे. आरक्षणासह अन्य मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून मंत्रीमंडळाची उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या नियमित बैठका घेऊन आढावा घेण्यात येईल व त्याची पूर्तता करण्यात येईल.

मराठा समाजाच्या अधिकाधिक विद्यार्थ्यांची निवासाची सोय व्हावी यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृहे बांधण्यासाठी जागा देण्यात येईल. तसेच बांधकामासाठी 5 कोटी रुपयांचे अनुदान शासन देईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणा :

  • 3 लाख शेतकऱ्यांच्या मुलांना कौशल्य विकास योजनेंतर्गत प्रशिक्षण
  • केंद्र सरकारकडून कौशल्य विकास योजनेला मंजुरी देण्यात आली
  • ओबीसींना मिळणारी सवलत मराठ्यांनाही मिळणार
  • मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत मिळणार
  • या सवलतीमुळे 10 लाख विद्यार्थ्यांना फायदा होणार
  • 605 कोर्सेससाठी शिष्यवृत्ती देण्यात येईल आणि 60 टक्के अट काढून टाकत 50 टक्क्यांवर आणली
  • आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाकडे पाठपुरावा करू
  • मराठा समाजासाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह बांधण्यात येणार
  • प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृहासाठी 450 कोटी रुपये मिळणार
  • स्वर्गीय अण्णाभाऊ साठे मुद्रा लोन मंजूर करण्यात आले
  • अॅट्रॉसिटी कायद्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात समिती स्थापन करण्यात येईल
  • राज्य मागास आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी विहित कालावधीची मर्यादा देणार
  • 3 लाख शेतकऱ्यांच्या मुलांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचं केंद्राने मंजूर केले आहे
  • कोपर्डी प्रकरणात फक्त एक साक्षीदार तपासण्याचे काम बाकी
  • कोपर्डी प्रकरणी लवकरच अंतिम निकाल

मराठा मोर्चाशी संबंधित आणखी बातम्या:

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com