प्रकाश महेता यांची रायगडच्या पालकमंत्रिपदावरून उचलबांगडी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

जिल्हा भाजपमध्ये असलेल्या नाराजीने त्यांचे पालकमंत्रिपद गेल्याचे सांगितले जात आहे. आता त्यांच्या जागी अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

मुंबई : राज्य कॅबिनेट सरकारमध्ये गृहनिर्माणमंत्री असलेले प्रकाश महेता यांची रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून उचलबांगडी करण्यात आली. जिल्हा भाजपमध्ये असलेल्या नाराजीने त्यांचे पालकमंत्रिपद गेल्याचे सांगितले जात आहे. आता त्यांच्या जागी अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

प्रकाश महेता हे भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सध्या अडचणीत आहेत. तसेच काही वक्तव्यांमुळे ते वादातही सापडले होते. याशिवाय त्यांच्या कार्यपद्धतीवर रायगड जिल्ह्यातील भाजपमध्येही नाराजी होती. पालकमंत्री म्हणून त्यांचे जिल्ह्याकडे लक्ष नसल्याच्या तक्रारी भाजप जिल्हा पदाधिकाऱ्यांकडून केल्या जात होत्या. त्यानंतर या नाराजीनंतर अखेर महेता यांची पालकमंत्रिपदावरून गच्छंती करण्यात आली. त्यांच्या जागी आता राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे.

Web Title: Marathi News Maharashtra News Mumbai News Prakash Maheta