पतंगराव कदम अनंतात विलीन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 मार्च 2018

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या पार्थिवावर सांगली जिल्ह्यातील वांगी येथील सोनहिरा साखर कारखाना येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. शासकीय इतमामात आज सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सांगली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या पार्थिवावर सांगली जिल्ह्यातील वांगी येथील सोनहिरा साखर कारखाना येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. शासकीय इतमामात आज सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी राज्यभरातून त्यांचे कार्यकर्त्यांसह हजारो नागरिकांनी उपस्थिती लावली.

पतंगराव कदम यांचे काल (शुक्रवार) मुंबईतील लीलावती रूग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सांगली जिल्ह्यासह राज्यभरात शोककळा पसरली. आज सकाळी त्यांचे पार्थिव पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. त्यानंतर एका खासगी हेलिकॉप्टरने पतंगराव कदम यांचे पार्थिव सांगलीतील वांगी येथे आणण्यात आले. सोनहिरा साखर कारखाना परिसरात संध्याकाळी सहाच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

दरम्यान, पतंगराव कदम यांचे पार्थिव पुण्यातील 'सिंहगड' या निवासस्थानी ठेवण्यात आले होते. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी खासदार सुरेश कलमाडी, खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

Web Title: Marathi News Maharashtra News Sangli News Patangrao Kadam Funeral