महाराष्ट्रातील 116 शाळांना टिंकरींग लॅब

दगाजी देवरे
मंगळवार, 2 जानेवारी 2018

शाळांमध्ये आधुनिक प्रयोगशाळा......!
महाराष्ट्रातील 116 शाळामंध्ये सर्वाधिक अकरा शाळा पुणे जिल्ह्यातील आहेत. त्यापाठोपाठ मुंबई दहा, कोल्हापुर दहा, अहमदनगर चार, अकोला एक, अमरावती सहा, बीड एक, बुलडाणा चार, चंद्रपुर एक, धुळे दोन, गडचिरोली दोन, गोदींया सात, हिगोंली एक, जळगाव तीन, जालना एक, कोल्हापुर दहा, लातूर चार, मुंबई शहर दहा, मुंबई उपनगर चार, नागपूर सात, नांदेड एक, नदुंरबार एक, नाशिक पाच, उस्मानाबाद दोन, रायगड दोन, रत्नागिरी दोन, सांगली दोन, ठाणे तीन, वर्धा दोन, वाशीम चार तर यवतमाळ जिल्हा तीन शाळांचा समावेश आहे.

म्हसदी (धुळे) : नीती आयोगाच्या 'अटल टिंकरींग लॅब' या अभिनव योजनेच्या दुस-या टप्प्यात देशात 1504, राज्यात 116 शाळांचा समावेश आहे. धुळे जिल्ह्यात अवघ्या दोन शाळांचा समावेश असून शिरपूर व साक्री तालुक्यातील प्रत्येकी एक-एक शाळाचा समावेश असून म्हसदी येथील वनश्री पुरस्कार प्राप्त गंगामाता कन्या विद्यालय व दहिवद(शिरपूर)येथील नूतन हायस्कूलचा समावेश आहे.

आयोगाच्या अटल इंनोव्हेशन मिशन अंतर्गत ही योजना राबवली जाते. नीती आयोगाने 'अटल टिंकरींग लॅब 'च्या माध्यमातून शाळेतील मुलांच्या क्रिएटिव्हीटीला प्रोत्साहन देण्याची मोहीम हाती घेतली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 928 शाळांचा समावेश करण्यात आला. यात राज्यातील 75 शाळांचा समावेश होता. आता राज्यातील 191 शाळांतील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. देशातील 388 जिल्हे व 79 स्मार्ट शहरातील दोन हजार 432 शांळाचा समावेश यात करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणित या विषयातील नव्या संकल्पना रूजवणे व कौशल्य विकसित करण्यासाठी या शाळांमध्ये आधुनिक प्रयोगशाळा निर्माण करण्यात येणार आहे. निवड झालेल्या प्रत्येक शाळांना वीस लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.यात इयत्ता सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.

गंगामाता कन्या विद्यालयास अनेक पुरस्कार
दरम्यान, येथील गंगामाता कन्या विद्यालयास शासनाचा छत्रपती शिवाजी वनश्री पुरस्कार, सृष्टी मित्र, निसर्गमित्र, धुळे व नदुंरबार जिल्ह्यातील पहिला आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मानांकित, तसेच विद्यालयाच्या मुख्यध्यापिका वर्षा देवरे यांना महाराष्ट्र गुणिजन रत्नगौरव, शासनाने जलसवंर्धन,वृक्षसंवर्धनाच्या उत्कृष्ट कांमाचा गौरव तसेच जिल्ह्यातील पहिला माध्यमिक शिक्षकांमधून आदर्श मुख्याध्यापिका (शिक्षक) पुरस्कार मिळाला आहे. हे सर्व शाळेतील सर्व सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मेहनतीने शक्य झाल्याची माहिती मुख्याध्यापिका सौ. वर्षा नरेंद्र देवरे यांनी "सकाळ"ला दिली.

शाळांमध्ये आधुनिक प्रयोगशाळा......!
महाराष्ट्रातील 116 शाळामंध्ये सर्वाधिक अकरा शाळा पुणे जिल्ह्यातील आहेत. त्यापाठोपाठ मुंबई दहा, कोल्हापुर दहा, अहमदनगर चार, अकोला एक, अमरावती सहा, बीड एक, बुलडाणा चार, चंद्रपुर एक, धुळे दोन, गडचिरोली दोन, गोदींया सात, हिगोंली एक, जळगाव तीन, जालना एक, कोल्हापुर दहा, लातूर चार, मुंबई शहर दहा, मुंबई उपनगर चार, नागपूर सात, नांदेड एक, नदुंरबार एक, नाशिक पाच, उस्मानाबाद दोन, रायगड दोन, रत्नागिरी दोन, सांगली दोन, ठाणे तीन, वर्धा दोन, वाशीम चार तर यवतमाळ जिल्हा तीन शाळांचा समावेश आहे.

Web Title: Marathi news Maharashtra news school lab