राज्यातील जलपातळीत चिंताजनक घट

कृष्णा लोखंडे
रविवार, 18 मार्च 2018

राज्यातील 126 तालुक्‍यांतील सात हजार 256 गावांतील भूजल पातळी एक मीटरहून अधिक घसरल्याने या गावांत यंदा भीषण पाणीसमस्या उद्भवू शकते, असा धक्कादायक अंदाज भूजल सर्वेक्षण विभागाने (जीएसडीए) वर्तविला आहे. 2017 मध्ये मॉन्सून सरासरीपेक्षा 20 टक्‍क्‍यांहूनही अधिकतर कमी झाल्याने भूजलात ही तूट आली. यंदा ती राज्यातील भीषण पाणीटंचाईची घंटा वाजविणारी ठरत आहे. 

अमरावती : राज्यातील 126 तालुक्‍यांतील सात हजार 256 गावांतील भूजल पातळी एक मीटरहून अधिक घसरल्याने या गावांत यंदा भीषण पाणीसमस्या उद्भवू शकते, असा धक्कादायक अंदाज भूजल सर्वेक्षण विभागाने (जीएसडीए) वर्तविला आहे. 2017 मध्ये मॉन्सून सरासरीपेक्षा 20 टक्‍क्‍यांहूनही अधिकतर कमी झाल्याने भूजलात ही तूट आली. यंदा ती राज्यातील भीषण पाणीटंचाईची घंटा वाजविणारी ठरत आहे. 

भूजल सर्वेक्षण विभागाकडून वर्षातून चार वेळा भूगर्भातील जलपातळी तपासली जाते. पाणलोट क्षेत्रातील तीन हजार 920 निरीक्षणे करत विहिरींमधील पाण्याची पातळी मोजली गेली. जानेवारी 2018 मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून पाणीपातळी खालावल्याचे वास्तव निदर्शनास आले. अनेक ठिकाणी विहिरी व बोअरवेल कोरड्या झाल्यात. याचा परिणाम राज्यात एप्रिल ते जूनदरम्यान भीषण पाणीसमस्या डोके वर काढणार, असा अंदाज जीएसडीएने वर्तविला. राज्यातील एक हजार 376 गावे अधिकतर दुष्काळाच्या प्रभावात असणार आहेत. 

कमी पावसाचा परिणाम 

जीएसडीएने दिलेल्या ताज्या अहवालात राज्यातील 353 तहसीलमध्ये 20 टक्‍क्‍यांहून कमी पाऊस झाला. 45 तहसीलमध्ये हे प्रमाण 20 ते 30 टक्के, 80 तहसीलमध्ये 30 ते 50 आणि 19 तहसीलमध्ये त्यापेक्षाही अधिक असल्याचे म्हटले आहे. भीषण पाणीसमस्या निर्माण होऊ शकणाऱ्या 120 पैकी 74 तहसील एकट्या विदर्भातील आहेत. यात अकोला 4, अमरावती 13, बुलडाणा 3, चंद्रपूर 14, गडचिरोली 6, गोंदिया 8, नागपूर 2, भंडारा 3, वर्धा 3, वाशीम 4 आणि यवतमाळ 14 यांचा समावेश आहे.

या अकरा जिल्ह्यांतील एक वा त्यापेक्षाही अधीक मीटरने पाणीपातळी घसरलेल्या गावांची संख्या 6,435 असून त्यात अमरावती 896, अकोला 848, यवतमाळ 1520, बुलडाणा 62, वाशीम 655, नागपूर 85, भंडारा 338, वर्धा 430, चंद्रपूर 831, गडचिरोली 316 आणि गोंदियातील 474 गावे समाविष्ट आहेत. 

जलपातळीतील घट 

1 मीटर : 10,382 गावांतील जलपातळीत झालेली घट 
2 मीटर : 6,546 गावांतील जलपातळीत झालेली घट 
3 मीटर : 1,376 गावांतील जलपातळीत झालेली घट 
20 टक्के : 7,256 गावांमधील पावसातील घट 
 

 
 

Web Title: Marathi News Maharashtra News Situation of Water Level tens