स्मार्ट पोलिसिंगमध्ये साताऱ्याची आघाडी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 मार्च 2018

सातारा - जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे, उपअधीक्षक कार्यालये व पोलिस मुख्यालयाला आयएसओ मानांकन मिळवत पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी राज्यात आघाडी घेतली आहे. स्मार्ट पोलिस ठाण्याच्या या कामाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जिल्हा पोलिस दलाचे कौतुक केले आहे. 

सातारा - जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे, उपअधीक्षक कार्यालये व पोलिस मुख्यालयाला आयएसओ मानांकन मिळवत पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी राज्यात आघाडी घेतली आहे. स्मार्ट पोलिस ठाण्याच्या या कामाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जिल्हा पोलिस दलाचे कौतुक केले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये स्मार्ट पोलिसिंग राबविण्याचे धोरण स्वीकारले आहे. तशी त्यांनी घोषणा केली होती. त्यातून प्रेरणा घेत संदीप पाटील यांनी संपूर्ण जिल्ह्यात स्मार्ट पोलिसिंग करण्याची काम पूर्ण करून दाखविले आहे. स्मार्ट पोलिस ठाणे या संकल्पनेत पोलिस ठाण्यांसाठी सुसज्ज व स्वच्छ इमारती, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विश्रामगृह, सुरक्षित लॉकअप, पुरेसा शस्त्रसाठा, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आवश्‍यक संख्याबळाची पूर्तता, सीसीटीव्ही यंत्रणा, सीसीटीएनएस प्रणाली, इंटरनेट सुविधा, ई-मेल व वॉटस्‌ऍप प्रणालीचा वापर अशा पायाभूत सुविधांच्या पूर्ततांचा त्यात समावेश होता. त्याचबरोबरच नागरिकांशी पोलिसांची आपुलकीने वागणूक, तक्रारदाराला योग्य मार्गदर्शन, तक्रारीची तत्काळ प्रत देणे, परिसरातील नागरिकांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी विविध समित्यांच्या नियमित बैठका, महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी विशेष प्रयत्न, वाहतुकीचे प्रश्‍न सोडविण्याला प्राधान्य, संबंधित सर्व विभागांशी समन्वय, तपासासाठी प्रशिक्षत मनुष्यबळ, तपासामध्ये आधुनिक यंत्रणांचा वापर, तपास लवकरात लवकर पूर्ण करणे, आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसाद देणारी यंत्रणा, पोलिस ठाण्यांतील रेकॉर्डचे योग्य पद्धतीने नियोजन अशा सर्वच पातळ्यावरील कामांमध्ये सुसूत्रता यांचा समावेश होता. 

अधीक्षक पाटील यांनी या सर्व पातळ्यांवर पोलिस ठाणे व कार्यालये सज्ज होण्यासाठी आवश्‍यक ती साधनसामुग्री उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्‍यक ते प्रशिक्षण दिले गेले. त्यातून जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांच्या कार्यपद्धतीत बदल झाला. त्याची दखल घेत जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे, उपअधीक्षक कार्यालये व पोलिस मुख्यालयातील सर्व विभागांना आयएसओ मानांकन मिळाले आहे. या कामासाठी प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांचा नुकताच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या वेळी मुख्यमंत्र्यांनी स्मार्ट पोलिस ठाण्यांबाबतची माहिती जाणून घेतली. स्मार्ट पोलिसिंगमध्ये जिल्ह्याने राज्यात आघाडी घेतल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ट्‌विटरवरून अधीक्षक पाटील यांना शाबासकीची थाप दिली. 

स्मार्ट पोलिस ठाण्यांतील सुविधा 
स्मार्ट पोलिस ठाणे या संकल्पनेत पोलिस ठाण्यांसाठी सुसज्ज व स्वच्छ इमारती, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विश्रामगृह, चांगली लॉकअप, पुरेसा शस्त्रसाठा, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आवश्‍यक संख्याबळाची पूर्तता, सीसीटीव्ही यंत्रणा, सीसीटीएनएस प्रणाली, इंटरनेट सुविधा, ई- मेल व वॉटस्‌ऍप प्रणालाचा वापर आदी सुविधांचा समावेश आहे.

Web Title: marathi news maharashtra police satara police