महाराष्ट्राची "रुसा' अनुदानात भरारी, देशातील 472 मध्ये 226 महाविद्यालये

residentional photo
residentional photo

नाशिक ः "नॅक'प्रमाणेच राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानात (रुसा) महाराष्ट्राने गरुडभरारी घेतलीय. "रुसा'च्या प्रत्येकी दोन कोटींच्या अनुदानात देशातील 472 महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्रातील 226 महाविद्यालयांचा समावेश आहे. अनुदानातून उच्चशिक्षणासाठी पायाभूत सुविधांची उपलब्धता करण्यात येणार असली तरीही राज्याच्या हिस्स्याची शिक्षण संस्थांना प्रतीक्षा कायम आहे. 

प्रयोगशाळा, ग्रंथालय, मैदान, जिमखाना, डिजीटलायझेशन अशा सुविधांचा विकास साधत महाविद्यालयांना उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढवता येणार आहे. उच्च शिक्षणाच्या महाविद्यालयांना अनुदान उपलब्ध करुन देण्यासाठी "रुसा'ची 2013 मध्ये स्थापना करण्यात आली. याच महिन्यातील रुसाच्या प्रकल्प मान्यता समितीच्या बैठकीत झालेले अनुदान विषयक निर्णय पाहता,

देशामध्ये "नॅक'च्या मूल्यमापनात देशातील इतर राज्ये एकीकडे आणि महाराष्ट्र एकीकडे अशी स्थिती असल्याचे चित्र पाहावयास मिळते. रुसातर्फे अनुदान मान्य झालेल्या महाविद्यालयांची संख्या जिल्हानिहाय अशी ः सातारा-4, ठाणे-9, मुंबई उपनगर-20, मुंबई-15, पुणे-21, कोल्हापूर-16, रत्नागिरी-4, नगर-14, रायगड-5, सांगली-6, गडचिरोली-3, बीड-8, नंदूरबार-4, जालना-2, सोलापूर-10, लातूर-6, हिंगोली-2, सातारा-5, औरंगाबाद-4, पालघर-1, अकोला-6, परभणी-5, धुळे-3, नांदेड-7, अमरावती-7, चंद्रपूर-2, वाशिम-1, सिंधुदुर्ग-1, बुलढाणा-5, यवतमाळ-2, जळगाव-6, उस्मानाबाद-4, गोंदिया-1, नागपूर-1, वर्धा-2. 

नाशिकमधील 14 महाविद्यालये 
"रुसा'च्या अनुदानाच्या यादीमध्ये नाशिक शहर आणि जिल्ह्यातील 14 महाविद्यालयांचा समावेश आहे. त्यात मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेची 5, महात्मा गांधी विद्यामंदिरची 6, गोखले शिक्षण संस्था, क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्था, लासलगावचे प्रत्येकी एक महाविद्यालय आहे. दरम्यान, देशातील 750 महाविद्यालयांना अनुदान देण्याचे उद्दिष्ट "रुसा'ने निश्‍चित केले आहे. त्यातील 729 महाविद्यालयांना मान्यता मिळाली आहे. अजूनही 21 महाविद्यालये प्रक्रियेत आहेत. त्यापैकी आसाम, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्‍मिर, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालॅंडमधील "मॉडेल' पदवी महाविद्यालयांची श्रेणी सुधारची महाविद्यालये आहेत. सविस्तर प्रकल्प अहवाल आणि जागेची कागदपत्रे सादर करण्यासाठी एक महिन्यांची मुदत देशातील महाविद्यालयांना देण्यात आली आहे. 

"रुसा' अनुदानास पात्र महाविद्यालये 
मणिपूर-9 गुजरात-70 
कर्नाटक-34 पश्‍चिम बंगाल-16 
पॉंडेचरी-5 तेलंगणा-2 
केरळ-30 झारखंड-2 
ओरिसा-1 बिहार-11 
हरियाना-2 मध्यप्रदेश-3 
तमिळनाडू-52 आंध्रप्रदेश-1 
आसाम-6 हिमाचलप्रदेश-1 
त्रिपुरा-1 

""राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानातंर्गत मिळणाऱ्या अनुदानात उरलेली रक्कम मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे देऊन महाविद्यालयातील उच्च शिक्षणाच्या पायाभूत सुविधा डिजीटलायझ करण्यात येतील. त्यासंबंधीचा आराखडा जमा करण्यात आला आहे.'' 
- डॉ. दिलीप शिंदे, प्राचार्य, वावरे महाविद्यालय 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com