साखर उत्पादनात राज्यात दुप्पट वाढ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 फेब्रुवारी 2018

भवानीनगर - राज्यात आजअखेर १८५ साखर कारखान्यांनी ६७३.९२ लाख टन उसाचे गाळप केले असून, सरासरी १०.८७ टक्के साखर उताऱ्यानुसार ७३.२३ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी राज्यातील साखरेचे उत्पादन जवळपास दुप्पट झाले आहे. 

या वर्षीच्या हंगामाचे वैशिष्ट्य म्हणजे साखरेचे उत्पादन वाढलेले आहे आणि दुसरीकडे उसाचे दैनंदिन गाळपही वाढले आहे. मागील वर्षी याच काळात १४९ साखर कारखान्यांनी ३५४ लाख टन उसाचे गाळप करून ३९.५२ लाख टन साखरेचे उत्पादन केले होते.

या वर्षी हा आकडा कारखान्यांनी चांगलाच वाढवला आहे. राज्यात पुणे विभाग उसाच्या गाळपात व साखर उत्पादनात आघाडीवर आहे. पुणे विभागातील ६१ साखर कारखान्यांनी आतापर्यंत २६४ लाख टन उसाचे गाळप करून २८.६१ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे.  कोल्हापूर विभागाने मात्र राज्याचा सरासरी साखर उताराही तोलून धरला असून, विभागात उच्चांकी १२.१० टक्के साखर उताऱ्यानुसार १६१ लाख टन उसाचे गाळप करून १९.५४ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. या वर्षी १८५ साखर कारखान्यांनी दररोज सरासरी ६.६७ लाख टन उसाचे गाळप चालविले आहे, तर मागील वर्षी हे गाळप १४९ कारखान्यांकडून सरासरी पाच लाखापर्यंत होते.

जिल्ह्यात ७९.२८ लाख टन गाळप
पुणे जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांनी आजअखेर ७९.२८ लाख टन उसाचे गाळप करून ८.७० लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. बारामती ॲग्रोने सर्वाधिक ७.७३ लाख टन उसाचे गाळप करून ८.५८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. सहकारी कारखान्यांमध्ये इंदापूरच्या कर्मयोगी शंकरराव पाटील कारखान्याने सर्वाधिक ७.५९ लाख टन उसाचे गाळप करून ८.०८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. जिल्ह्यात साखर उताऱ्यात मात्र सोमेश्वर कारखान्याने ११.५८ टक्के उतारा मिळवत घेतलेली आघाडी अजून टिकवून ठेवलेली आहे. त्याखालोखाल दौंड शुगर (११.५३ टक्के), माळेगाव (११.३७ टक्के) कारखाने आहेत. जिल्ह्यातील बहुतेक सर्वच कारखाने गाळप क्षमतेपेक्षा अधिक गाळप करीत असून, दैनंदिन ७६ हजार टन उसाचे गाळप कारखाने करीत आहेत. 

Web Title: marathi news maharashtra sugar sugar factory