महेश झगडेंची सचिवपदी बदली,राजाराम माने विभागीय आयुक्त 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

नाशिकः नाशिकचे विभागीय आयुक्त महेश झगडे यांची मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागात प्रशासन-पुनर्रचनाचे प्रधान सचिव म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या विभागीय आयुक्तपदावर महाऊर्जाचे महासंचालक राजाराम माने यांची बदली करण्यात आली आहे. 

श्री. झगडे यांच्या निवृत्तीला तीन महिन्यांचा कालावधी उरला आहे. तसेच त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था, महसूल विभागाच्या कामकाजाला शिस्त लावण्याचा प्रयत्न करत नुकताच त्र्यंबकेश्‍वरचा दोनशे कोटींचा जमीन घोटाळा उघडकीस आणला आहे. डिसेंबर 2017 मध्ये त्यांना भारतीय प्रशासकीय सेवेच्या प्रधान सचिव श्रेणीत पद्दोन्नती देण्यात आली. त्यामुळे श्री. झगडे हे नाशिकमध्ये निवृत्त होतील अशी जनतेची अटकळ होती. पण अचानक त्यांची बदली झाल्याने जनतेच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, श्री. झगडे हे नाशिकचे विभागीय आयुक्त म्हणून मंत्रालयात आज अखेरच्या बैठकीस हजर होण्यास गेले आहेत. 
 
Web Title: marathi news mahesh zagde transfer

टॅग्स
फोटो गॅलरी