मुंबई पोलिसांनी अनुभवला टेन्शन फ्री मोर्चा

टीम ई सकाळ
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

साडेतीन हजार स्वयंसेवकांमुळे शिस्त
एक मराठा लाख मराठा अशा अक्षरातील टी-शर्ट परिधान केलेले तरुण तरुणी मोठ्या संखेने दिसत होते. या लाखोंच्या संख्येला शिस्तबद्धरित्या मोर्चात सहभागी होण्यासाठी स्वयंसेवक काम करत होते. तसेच मोर्चकऱ्यांकडून होत असलेल्या कचराही लगेच उचलण्यात आल्याने या मोर्चाचे सर्वस्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

मुंबई : जय जय जय जय जय शिवाजी, हरहर महादेव, आरक्षण मिळालेच पाहिजे, एक मराठा लाख मराठा, जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी मुंबईत आलेल्या भगव्या वादळाला सावरण्यासाठी पोलिसांनाही काही विशेष धावपळ करावी लागली नसल्याचे दिसून आले. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आतापर्यंत झालेल्या मोर्चांप्रमाणे हा मोर्चाही आपल्या शिस्तीनेच पार पडला. मोर्चेकऱ्यांकडून पोलिसांना खाणे व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

आज (बुधवार) सकाळपासून भायखळा येथील जिजामाता उद्यानात मराठा बांधव एकत्र येण्यास सुरवात झाली. हळूहळू याचे रुपांतर लाखोंच्या संख्येत झाले. छत्रपती शिवाजी महाराज स्थानकाचा परिसर घोषणांनी दणाणून गेला. मोर्चेकऱ्यांनी शिस्तिचे पालन करावे, परिसरात स्वच्यता ठेवावी, अशा सूचना ध्वनि क्षेपकावरुन दिल्या जात होत्या. तरुणांचा सळाळता उत्साह या आझात मैदानाच्या परिसरात दिसत होता. महिला आणि तरुणींचा लक्षणीय सहभाग होता. मोर्चाच्या ठिकाणी स्वयंसेवकांना तैनात करण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांना याचा फारसा ताण निर्माण झाला नाही. त्यांनी पोलिसांना सर्वोतोपरी मदत केली. सातारा, सांगली, कोल्हापुर, कोकण, मराठवाड़ा, विदर्भातुन तरुणांचे ग्रुप मोर्च्यात उत्साहाने सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान कोणतेही राजकीय तसेच विविध संघटनांचे बॅनर लावण्यात आले नव्हते. 

फोर्ट परिसरात पार्किंग बंद केल्यामुळे पोलिसांना मोर्चाचे नियंत्रण करने सोपे झाले. राज्याच्या पोलिस महासंचालकांच्या नियंत्रण कक्षात बसून गृहराज्यमंत्री दिपक केसरकर संपूर्ण परिस्थितीचे अवलोकन करीत होते.

साडेतीन हजार स्वयंसेवकांमुळे शिस्त
एक मराठा लाख मराठा अशा अक्षरातील टी-शर्ट परिधान केलेले तरुण तरुणी मोठ्या संखेने दिसत होते. या लाखोंच्या संख्येला शिस्तबद्धरित्या मोर्चात सहभागी होण्यासाठी स्वयंसेवक काम करत होते. तसेच मोर्चकऱ्यांकडून होत असलेल्या कचराही लगेच उचलण्यात आल्याने या मोर्चाचे सर्वस्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

Web Title: Marathi news Maratha Kranti Morcha mumbai police