मराठी विषय बारावीपर्यंत सक्तीचा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

मुंबई - मराठी विषय बारावीपर्यंत सक्तीचा करण्याबाबत सरकार अभ्यास मंडळाला सूचना करील, अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषा अधिक लोकाभिमुख होऊन ज्ञानभाषा व्हावी, याकरिता सरकारने भाषेच्या विकासप्रक्रियेला अधिक चालना द्यावी, अशी शिफारस करणारा ठराव आज विधान परिषदेत सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी मांडला. त्या वेळी तावडे बोलत होते. राज्य कारभारात मराठीचा अधिक उपयोग करण्याबद्दल पावले उचलण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. 

सुनील तटकरे यांनी मराठी भाषेच्या धोरणाबाबत सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, ‘‘राज्य सरकारवर ‘लोकराज्य’ हे मासिक गुजराती भाषेत प्रकाशित करण्याची वेळ येणे हा मराठीचा अपमान आहे. इंग्रजी शिक्षणाकडे ग्रामीण भागाचाही कल वाढत असल्याने मराठी भाषेला समृद्ध करण्याची जबाबदारी सरकारसह आपल्या सगळ्यांचीच आहे.’’

राज्याचे मुख्यमंत्री मराठीतून न बोलता इंग्रजी आणि हिंदीतून का बोलतात, असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी या ठरावावर बोलताना उपस्थित केला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी; तसेच बोलीभाषा वृद्धिंगत करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी केली; तर शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी मराठी भाषा बंद करू नये, अशी मागणी केली. भाजपचे भाई गिरकर यांनी आठवीपर्यंत असलेली मराठी विषयाची सक्ती बारावीपर्यंत करावी, अशी सूचना केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत टकले यांनी या ठरावाच्या निमित्ताने केलेल्या भाषणात मराठी भाषेच्या साहित्य संपदेचा आढावा घेतला. विधान भवनाच्या प्रांगणात ‘मराठी भाषा दिना’च्या कार्यक्रमात ध्वनिक्षेपक बंद पडले. हा प्रकार निंदनीय आहे. त्याची चौकशी करा, अशी मागणी नीलम गोऱ्हे यांनी केली.

वाहनांवर मराठी नंबर प्लेट आवश्‍यक 
वाहन क्रमांकाची पाटी इंग्रजीतच आवश्‍यक आहे का? मोटारीवर मराठीत क्रमांक असल्याने त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आल्याचा अनुभव असल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितला. वाहनांवर मराठीतच क्रमांक असावा, अशी सूचना त्यांनी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांना केली.

Web Title: marathi news marathi HSC maharashtra vidhan parishad