'मराठीबाबत सरकारचे खायचे दात वेगळे'

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

मुंबई -  राज्यपालांच्या अभिभाषणावेळी मराठीत अनुवाद न झाल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील विधानसभेत उपस्थित करून संबंधितांवर कारवाईची मागणी केली. या सरकारचे खायचे अन्‌ दाखवायचे दात वेगवेगळे आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केली आहे. 

मुंबई -  राज्यपालांच्या अभिभाषणावेळी मराठीत अनुवाद न झाल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील विधानसभेत उपस्थित करून संबंधितांवर कारवाईची मागणी केली. या सरकारचे खायचे अन्‌ दाखवायचे दात वेगवेगळे आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केली आहे. 

मराठी भाषा दिनाच्या आदल्या दिवशी महाराष्ट्राच्या विधानभवनात मराठीचा अवमान होण्यासारखे दुसरे कोणतेही दुर्दैव असू शकत नाही, असे विखे म्हणाले. "सरकारला मराठी भाषेविषयी गांभीर्य नाही. ते बेफिकीर आहेत. त्यामुळे अशा चुका सरकारकडून झालेल्या आहेत. उद्या (ता. 27) मराठी भाषा दिन आहे. त्याच्या पूर्वसंध्येला सरकारने मराठी भाषेचा खून केला आहे,' असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयंत पाटील यांनी म्हटल्यावर सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात विधानसभेत जोरदार खडाजंगी झाली. राज्याच्या इतिहासात अशी पहिल्यांदाच घटना घडली आहे. सरकारचा कारभार बेफिकिरीने चालला आहे, याचे हे उदाहरण असल्याचा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला. आजचा प्रकार हा सर्वांना कमीपणा आणणारा आहे. शिक्षणमंत्री तावडे यांनी अनुवाद करते वेळी अध्यक्ष सभापती यांची परवानगी घेतली होती का, हा खुलासा झाला पाहिजे, अशी मागणी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केली. 

शिवसेना गप्प का? - अजित पवार 
उद्याच्या मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येलाच सभागृहात मराठीचा अपमान केला गेला. शिवसेनाही या वेळी गप्प बसली होती. त्यामुळेच आम्ही राज्यपालांच्या भाषणावर नाईलाजाने बहिष्कार टाकला व विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून या सरकारचा निषेध केला, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितले. ते म्हणाले की, आज अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभात्याग करावा लागला; कारण, 12 कोटी मराठी भाषकांचा सरकारने अपमान केला. आमच्या काळातही राज्यपाल हिंदी, इंग्रजीत भाषण करायचे; पण विधानसभेच्या 288 व विधान परिषदेच्या 78 मराठी आमदारांसाठी मराठीमध्ये भाषांतर व्हायचे; पण या वेळी भाषण सुरू होऊन 15 मिनिटे झाली तरी भाषांतर केले गेले नाही. आम्ही वारंवार सूचना केली तरीही भाषांतर झाले नाही.

Web Title: marathi news marathi Radhakrishna Vikhe marathi day