बारामती येथे जाऊन राहावे असे वाटते: एकनाथ खडसे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जानेवारी 2018

आज भाजपत, उद्याचे माहीत नाही 
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या कृषिधोरणाबद्दल मी नेहमीच खुल्या मनाने कौतुक केले आहे. त्यांनी बारामती येथे कृषिक्षेत्रात संशोधन करून नवी मुहूर्तमेढ रोवली आहे. मला अनेकदा बारामती येथे जाऊन राहावे असे वाटते. आपले म्हणणे नेहमी मोकळे असते. मी 40 वर्षांपासून भाजपमध्ये आहे, पण उद्याचं काही सांगता येत नाही. मी आणि अजित पवार तातडीने निर्णय घेत होतो, तसे अन्य मंत्री का घेत नाहीत? ते पाऊल मागे का घेतात, असा प्रश्न कार्यकर्ते उपस्थित करत असल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले.

रावेर : राज्यात शेतीची अवस्था वाईट आहे. शेतीला सर्वोच्च प्राधान्य देऊन कृषी विकासाची चर्चा व्हायला हवी असताना शेती सोडून अन्य विषयांवरच सरकारमध्ये चर्चा होत असून, शासकीय पातळीवर शेतीक्षेत्र पूर्णपणे दुर्लक्षित ठरले आहे, अशा शब्दांत माजी महसूलमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी आपल्या सरकारला घरचा आहेर दिला. 

रावेर येथील श्रमसाधना केळी प्रोड्यूसर कंपनीचे उद्‌घाटन समारंभात खडसे म्हणाले, की राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली राज्यात पणन व मार्केटिंग संस्था आहेत. मात्र त्या सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा आमदारांच्या दबावाखाली असल्याने हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे स्वतंत्र, स्वायत्त निर्णय घेऊ शकले नाही. यामुळे शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. सध्या शेती व शेतकऱ्यांची अवस्था वाईट झाली आहे. मध्यस्थ, दलाल, व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लुबाडणूक होत आहे. शेतीमालाचा दर्जा, उत्पादन, तसेच बाजारपेठेत शेतीमालाला भाव मिळणे हे शेतकऱ्यांच्या आवाक्‍यात नाही. शेतकरी स्वतःच्या मालाचा भाव स्वतः ठरवू शकत नाही. केळीला बाजारपेठ मिळाली पाहिजे. दलाली नष्ट झाली पाहिजे. त्यासाठी शेतकऱ्यांना संघटित करून हक्काची कंपनी निर्माण होणे गरजेचे आहे. 

आज भाजपत, उद्याचे माहीत नाही 
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या कृषिधोरणाबद्दल मी नेहमीच खुल्या मनाने कौतुक केले आहे. त्यांनी बारामती येथे कृषिक्षेत्रात संशोधन करून नवी मुहूर्तमेढ रोवली आहे. मला अनेकदा बारामती येथे जाऊन राहावे असे वाटते. आपले म्हणणे नेहमी मोकळे असते. मी 40 वर्षांपासून भाजपमध्ये आहे, पण उद्याचं काही सांगता येत नाही. मी आणि अजित पवार तातडीने निर्णय घेत होतो, तसे अन्य मंत्री का घेत नाहीत? ते पाऊल मागे का घेतात, असा प्रश्न कार्यकर्ते उपस्थित करत असल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले.

Web Title: marathi news marathi websites Jalgaon News Eknath Khadse Devendra Fadnavis