धडाडीचे कृषी अायुक्त सुनील केंद्रेकर यांची बदली

धडाडीचे कृषी अायुक्त सुनील केंद्रेकर यांची बदली

पुणे : राज्यातील कृषी विभागाला शिस्त लावण्याचा धडका करतानाच, सर्वसामान्य शेतकऱ्याची प्रशासनात कदर व्हावी म्हणून धडपडणारे राज्याचे कृषीअायुक्त सुनील केंद्रेकर यांची राज्य सरकारने अखेर बदली केली अाहे.

गेल्या सात-आठ दिवसांपासून कृषी आयुक्त केंद्रेकर यांच्या बदलीची जोरदार चर्चा राज्यात सुरू होती. अखेर या चर्चेला आज शासनाने आदेश काढून विराम दिला. कृषी अायुक्त केंद्रेकर यांनी आजच राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘शेतकरी योजना आणि निधीचा वापर’ या विषयावर आयुक्तालयात पाचारण केले आहे. सध्याही बैठक सुरू आहे, या दरम्यानच राज्य सरकारकडून बदलीचा अादेश आल्याने कृषी विभागात एकच खळबळ उडाली.

श्री. केंद्रेकर यांच्या जागी यवतमाळचे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रतापसिंह यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना तत्काळ जबाबदारी स्विकारण्यासही सांगण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com