उद्धव ठाकरे सरकारमधून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत : शरद पवार 

उद्धव ठाकरे सरकारमधून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत : शरद पवार 

कर्जत (रायगड) : उद्धव ठाकरे मला १० दिवसांपूर्वी भेटले. त्यांनी विचारले तुमची राजकीय भूमिका काय ? त्यावर मी त्यांना म्हणालो, ‘तुम्ही तुमची भूमिका जाहीर करा, आम्ही आमची भूमिका जाहीर करतो’. मला असे वाटतेय की, सरकारमध्ये राहण्याची उद्धव यांची मानसिकता राहिलेली नाही, असे अत्यंत सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. 
चिंतन शिबीराप्रसंगी पत्रकारांशी अनौपचारिक बोलताना त्यांनी ही माहिती दिली. उद्धव यांना त्यांचा पक्ष महाराष्ट्रात वाढवायचा आहे. भाजपला दूर ठेवून पक्षवाढीसाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यामुळे ते सरकारमधून बाहेर पडतील, अशी शक्यता पवार यांनी व्यक्त केली. 
सध्या राहूल गांधी यांच्या सभांना जनतेमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियामध्येही राहूल यांची लोकप्रियता वाढत आहे. त्यामुळेच भाजप सुद्धा राहूल यांना गांभिर्याने घेऊ लागला आहे. माजी पंतप्रधान डाॅ. मनमोहनसिंग हे सौम्य स्वभावाचे असले तरी, ते जे काही बोलतात त्यातील अर्थ महत्वाचा असतो. नोटबंदी आणि जीएसटीविषयी डाॅ. मनमोहनसिंग यांनी केलेली टिप्पणी म्हणूनच महत्वाची आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
राज्याचा कृषी विकासदर १२ टक्क्यांवर गेल्याची जाहिरात फडणवीस सरकार करीत असल्याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता ‘देशाचाही कृषी विकासदर १२ टक्के नसल्याची’ खिल्ली पवार यांनी उडविली. राज्यातील भाजप सरकारने जाहिरातींचा इतका भडीमार केला आहे की, निवडणुका जवळ आल्या आहेत की काय असे वाटू लागल्याचे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com