residentional photo
residentional photo

गॅस वितरणाच्या निमित्ताने 1600 कोटीची गुंतवणूक- संचालक राजेश पांडे 

नाशिक ः देशात स्वच्छ इंधन उपक्रमार्तंगत नवव्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यात नैसर्गिक गॅस वितरणाचा श्रीगणेशा सुरु होणार आहे. पालघर येथून शंभर किलोमीटरवर नाशिकपर्यत भुमिगत वाहिण्याद्वारे गॅस आणून तो पुरविला जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस (एमएनजीएल) कंपनीला काम मिळाले आहे.

 साधारण 1600 कोटीची गुंतवणूकीच्या उपक्रमाचा उद्या (ता.22) मविप्रच्या रावसाहेब थोरात सभागृहातून पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपक्रमाचा शुभारंभ होणार आहेत. 

कंपनीतर्फे आज कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ए.एम.तांबेकर, संचालक राजेश पांडे, व्यवस्थापक (एचआर) सचिन काळे, मुख्य व्यवस्थापक मयुरेश गाणू, सुजित रुईकर आदीनी नाशिकमधील गॅस वितरणाच्या उपक्रमाची अधिकृत घोषणा केली. 

श्री तांबेकर म्हणाले की, गेल इंडिया आणि भारत पेट्रोलियम यांचा संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीची स्थापना करण्यात आली असून नाशिकसह धुळे, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, सातारा,सांगली नगर आदी जिल्ह्यात हा उपक्रमाचा श्रीगणेशा होणार आहे. नाशिकमध्ये गेल्या 3 महिण्यापासून कंपनीचे सर्व्हेक्षण सुरु आहे. साधारण आणखी तीन महिण्याच्या सर्व्हेक्षणानंतर हे कामकाज सुरु होईल. भुमिगत गॅस वाहिण्यांसाठी महापालिकेची परवानगी मिळताच, प्रत्यक्ष कामकाज सुरु होईल. पुणे महापालिकेने भुमिगत गॅस वाहिण्या टाकण्याच्या खड्डे खोदण्याला सवलत दिली तद्वतच नाशिक महापालिकेकडून सवलत मिळेल अशी अपेक्षा असून तसे झाल्यास, ग्राहकांना स्वस्तात गॅस देणे सोपे होईल. असे सांगितले. 


नाशिकला 40 गॅस स्टेशनचे नियोजन 
घरगुती गॅससाठी 3 हजार रुपये अनामत 
घरगुती गॅस कनेक्‍शनला 500 रुपये शुल्क 
उद्योग व्यवसाय, वाहातूकीसाठी पहिले प्राधान्य 
100 घरांच्या सोसायट्यांना प्राधान्याने पुरवठा 
अनुदान बंद झाल्यावर प्रचलित इंधनापेक्षा गॅस स्वस्तच 


15 टक्केपर्यत गॅसवापर 
देशात 2030 पर्यत कॉबन डायऑक्‍साईडचे प्रमाण 33 टक्केपर्यत कमी करण्यासाठी देशात सध्याचा 6 टक्के असलेला नैसर्गिक गॅस पुरवठा 15 टक्केपर्यत वाढविण्याचे 
केंद्र शासनाचे उदि÷ष्ट्य आहे. आतापर्यत देशात 1500 गॅस वितरण केंद्राद्वारे 32 लाख ग्राहकांपर्यत नैसर्गिक गॅस पुरविण्यात यश आले आहे. नाशिकचा नवव्या टप्प्यात समावेश आहे. 
- ए.एम.तांबेकर (व्यवस्थापकीय संचालक एम.एन.जी.एल ) 

तूर्तास टॅकरने गॅसपुरवठा 
कंपनीच्या गॅस पाईपलाईनला दोन वर्षाचा कालावधी लागणार आहे. सर्व्हेक्षण पूर्ण होताच 5 हजार इंच किलोमीटरचे गॅस वाहिण्याचे जाळे उभारुन 38 गॅस वितरण केंद्र सुरु करण्याचे नियोजन आहे. पण तोपर्यत कंपनीकडून टॅकरद्वारे गॅस आणून तो पुरविला जाणार आहे. गॅस वितरणात औद्योगिक व्यवसायीक क्षेत्राशी संर्पक सुरु आहे. शंभर व त्याहून आधिक घरांच्या हौसींग सोसायट्यांना प्राधान्यांना गॅस वितरणाचे उदि÷ष्ट्य आहे. 
- राजेश पांडे (स्वतंत्र संचालक एमएनजीएल ) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com