मुख्यमंत्री बसण्याआधीच हेलिकॉप्टरचा 'टेक ऑफ'चा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

अलिबाग : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसण्यापूर्वीच हेलिकॉप्टरने टेक ऑफ घेतल्याची घटना आज (शुक्रवार) रायगड जिल्ह्यातील पेण येथे घडली. उपस्थितांनी मुख्यमंत्र्यांना वेळीच बाजूला केल्यामुळे संभाव्य अपघातातून मुख्यमंत्री थोडक्यात बचावले.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला कोणताही अपघात झाला नसल्याचा खुलासा मुख्यमंत्री सचिवालयाने केला आहे. विमानाला अपघात झाल्याचे वृत्त पसरविले जात असून असा कुठलाही अपघात झाला नसल्याचे मुख्यमंत्री सचिवालयाने म्हटले आहे. 

रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे ते शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ठेवण्यात आलेल्या नाट्यगृहाच्या उदघाटनाच्या कार्यक्रमाला ते आले होते. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने पेणपर्यंत आणि तेथून मोटारीने कार्यक्रमस्थळी आले होते. हा उदघाटन सोहळा संपून ते पुढे डोलवी-धरमतर येथील जेएसडब्ल्यू ईस्पात कंपनीच्या हेलिपॅडवर दुपारी 1.55 वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमध्ये चढण्यासाठी निघाले. मुख्यमंत्री बसण्यापूर्वीच हेलिकॉप्टरने टेक ऑफ घ्यायला सुरूवात केली. टेक ऑफ जवळ उभ्या असलेल्या व्यक्तींना हेलिकॉप्टरची धडक बसू शकते. मुख्यमंत्री हेलिकॉप्टरच्या जवळ उभे होते. हेलिकॉप्टर टेक ऑफ घेत आहे, हे पाहून उपस्थित सुरक्षा रक्षक आणि पोलीस अधिकाऱयांनी तत्काळ मुख्यमंत्र्यांना बाजूला घेतले. 

रायगडचे जिल्हाधिकारी पी. डी. मलिकनेर यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर पुन्हा लँड करण्यात आले. त्याच्या पंख्यांची चाचणी घेतली गेली. त्यानंतर मुख्यमंत्री त्याच हेलिकॉप्टरने मुंबईला गेले. 

याआधी मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला 25 मे रोजी लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे अपघात झाला होता. टेक ऑफ घेतल्यानंतर हेलिकॉप्टर काही क्षणातच कोसळले होते. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या

आता शाळा सुटेल, पण पाटी फुटणार नाही; 'खापराची' पाटी होतेय गायब

द. चिनी समुद्रात अमेरिकेची लढाऊ विमाने;चीनला थेट आव्हान

विक्रीतील मध्यस्थ हटवून वाढवला शेतीतील नफा

वयाच्या पंचाहत्तरीतही मुख्याध्यापक झाले विद्यार्थी

मेरे बस में होता, तो बुऱ्हान वणीको जिंदा रखता: काँग्रेस नेता

Web Title: marathi news mumbai breaking news mumbai news alibaug news Devendra Fadnavis Helicopter