शेतकऱ्यांच्या लाँग मार्चला भारिपचा पाठिंबा - अशोक सोनोने

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 मार्च 2018

विविध मागण्यांसाठी भारतीय किसान सभेने आयोजित केलेला शेतकऱ्यांचा लाँग मार्च सोमवारी 12 तारखेला विधानभवनावर धडकणार आहे.

खामगाव ( बुलडाणा ) शेतकऱ्यांच्या लाँग मार्चला आता भारिप बहुजन महासंघाने पाठींबा दिला असून सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करत नसेल तर भारिप आणखी तीव्र आंदोलन करेल अशी माहीती भारिप बहूजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी दिली आहे.

विविध मागण्यांसाठी भारतीय किसान सभेने आयोजित केलेला शेतकऱ्यांचा लाँग मार्च सोमवारी 12 तारखेला विधानभवनावर धडकणार आहे. या मार्चमध्ये लाखोंच्या संख्येनं शेतकरी बांधवांचा सहभाग असून या शेतकऱ्यांच्या विविध मागण्या सरकारकडून मान्य करुन घेण्याकरिता भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाने भारतीय किसान सभेच्या लाँग मार्चला आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत, असे भारिप बहुजन महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविले आहे. तरी या शेतकऱ्यांच्या लाँग मार्च मध्ये राज्यातील भारिपच्या कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे तसेच जर सरकारने येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मान्य केल्या नाही. तर सरकारविरोधात आमचा हा संघर्षमय लढा सुरुच राहिल, असा परखड इशारा देखील प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी दिला आहे.

Web Title: marathi news mumbai long march farmers bharipa party support politics