सहा वर्षांची असतानाच बलात्कार - अभिनेत्री डेझी इराणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 मार्च 2018

मुंबई - ज्येष्ठ अभिनेत्री डेझी इराणी यांनी त्यांच्यावर त्या सहा वर्षांच्या असताना बलात्कार झाल्याची धक्कादायक माहिती एका इंग्रजी वर्तमानपत्राशी बोलताना उघड केली आहे. डेझी यांनी बालकलाकार म्हणून "बूट पॉलिश', "नया दौर', "जागते रहो' अशा अनेक चित्रपटांत काम केले आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मद्रास (आत्ताचे चेन्नई) येथे त्या गेलेल्या असताना त्यांच्यासोबत गार्डियन म्हणून आलेल्या नझर नावाच्या व्यक्तीने त्यांच्यावर बलात्कार केल्याचे भयानक सत्य त्यांनी उघड केले आहे.

मला साठ वर्षांनंतरही तो प्रसंग अंधूक आठवतो आहे. त्या वेळी झालेल्या यातना आणि त्याने बेल्टने मारल्यावर झालेला त्रास मला आजही आठवतो, असे त्यांनी सांगितले. "हम पंछी एक डाल के' या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी मद्रास येथे गेले असताना माझ्यासोबत नझर आला होता. एका रात्री हॉटेलच्या रूमवर येऊन त्याने मला बेल्टने मारले आणि माझ्यावर बलात्कार केला. तसेच, कोणालाही सांगितलेस तर जिवे मारण्याची धमकीही त्याने दिली. मी दुसऱ्या दिवशी काही झालेच नाही अशा आविर्भावात सेटवर गेले होते; पण मला झालेल्या त्या यातना आजही आठवतात, असे त्यांनी सांगितले.

Web Title: marathi news mumbai maharashtra news daisy irani rape