मुंबई विमानतळाने तोडला स्वत:चा उच्चांक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

24 तासांत 980 विमानांचे उड्डाण
मुंबई - एकेरी धावपट्टी असलेले जगातील एकमेव विमानतळ अशी मुंबई विमानतळाची ओळख आहे. या विमानतळावर 20 जानेवारीला तब्बल 980 विमानांनी टेक ऑफ व लॅंडिंग केले आहे. याआधी डिसेंबरमध्ये मुंबई विमानतळावरून 974 विमानांनी उड्डाण व लॅंडिंग केले होते, अशी माहिती मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जनसंपर्क विभागाने दिली.

24 तासांत 980 विमानांचे उड्डाण
मुंबई - एकेरी धावपट्टी असलेले जगातील एकमेव विमानतळ अशी मुंबई विमानतळाची ओळख आहे. या विमानतळावर 20 जानेवारीला तब्बल 980 विमानांनी टेक ऑफ व लॅंडिंग केले आहे. याआधी डिसेंबरमध्ये मुंबई विमानतळावरून 974 विमानांनी उड्डाण व लॅंडिंग केले होते, अशी माहिती मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जनसंपर्क विभागाने दिली.

मुंबई विमानतळ हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे रेकॉर्ड ब्रेक करणारे मोठे विमानतळ आहे, तर ब्रिटनचा गॅटविक विमानतळ हा जगातील एकेरी धावपट्टी असलेला सर्वांत मोठा दुसरा विमानतळ आहे. ब्रिटन विमानतळाच्या आकडेवारीनुसार गॅटविक विमानतळाची एका दिवसात उन्हाळ्यात 870 विमाने उड्डाण व लॅंडिंगची क्षमता आहे. मुंबई विमानतळ 24 तास सुरू असते. त्यामानाने गॅटविक विमानतळ 19 तास सुरू असते. तेथून पहाटे 5 ते मध्यरात्रीपर्यंत उड्डाण केले जाते. गॅटविक विमानतळावरून दर तासाला 55 विमाने उड्डाण व लॅंडिंग करतात, तर मुंबई विमानतळावरून तासाला 52 सेवा उड्डाण व लॅंडिंग करतात.

या दोन विमानतळांतील मुख्य फरक म्हणजे दोन्ही ठिकाणी असलेले पर्यावरण. लंडनमध्ये चार विमानतळ आहेत, त्यातील हिथ्रो हा सर्वांत मोठा विमानतळ असून, त्यानंतर गॅटविक, स्टॅनस्टेड आणि ल्यूटन आहे. हिथ्रोच्या विमानतळावर दोन धावपट्टी आहेत, तर उर्वरित विमानतळांवर प्रत्येकी एक धावपट्टी आहे. यामुळे लंडन-बाउंड फ्लाइटसाठी एकूण पाच धावपट्ट्या बनविल्या आहेत.

दुसरीकडे मुंबईत फक्त एकच विमानतळ आहे. मुंबई विमानतळासाठी क्रॉस धावपट्टी आहे. यातील एक मुख्य धावपट्टी असून, दुसरी लहान धावपट्टी आहे. यापैकी एकावेळी एकाच धावपट्टीचा वापर होतो. त्यातील मुख्य धावपट्टी ही आपत्तीजन्य स्थितीसाठी बंद ठेवली आहे.

24 नोव्हेंबर 2017 ला तब्बल 969 विमानांचे उड्डाण व लॅंडिंग केले.
6 डिसेंबरला 2017 ला तब्बल 974 विमानांचे उड्डाण व लॅंडिंग केले.
20 जानेवारी 2018 ला 980 विमानांचे उड्डाण व लॅडिंग केले.

Web Title: marathi news mumbai news aeroplane flight airport