हताश राणेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

मुंबई : राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटकपक्ष झालेल्या स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल भेट घेतली. मंत्रिमंडळ समावेशाबाबत त्यांनी ही भेट घेतल्याचे समजते.

काँग्रेसमधून राजीनामा देऊन काही महिन्यांपूर्वी बाहेर पडलेल्या राणेंनी आपल्याला फार प्रतीक्षा करायची सवय नाही. 2017 मध्ये आपला शपथविधी होईलच, असे जाहीर केले होते. मात्र 2018 चा एक महिना उलटून गेला तरी अद्यापही त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. 

मंत्रिमंडळ विस्ताराच्या निमित्ताने शिवसेना सरकारमधून बाहेर पडली तर सरकार अल्पमतात येईल, असे लक्षात आणून देत फडणवीस यांनी राणेंचा शपथविधी सध्या बाजूला ठेवल्याचे मानले जाते. मात्र आता किती प्रतीक्षा करायची, असा प्रश्‍न राणे यांना पडला आहे.

राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निमित्ताने शिवसेनेने भाजपवर केलेली टीका केंद्रीय नेतृत्वाला आवडलेली नाही. त्यामुळे फडणवीस यांनी आता सक्रिय व्हावे, अशी केंद्रीय नेतृत्वाची अपेक्षा असल्याचे मानले जाते. याच पार्श्‍वभूमीवर राणे यांनी नुकतीच राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा केल्याचे समजते.

काल एक तास चाललेल्या या बैठकीत राणे यांनी आपली अस्वस्थता स्पष्ट केल्याचे समजते. मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार, असे सांगितले जात होते. मात्र शिवसेनेला बाहेर पडण्याचे निमित्त स्वत:हून उपस्थित करणे योग्य नसल्याचे फडणवीस यांचे मत आहे. केंद्रीय नेतृत्वाकडून यासंबंधात दबाव आणण्यात राणे यशस्वी होतात काय, याची चर्चा सुरू आहे. या चर्चेबाबत राणे आणि फडणवीस यांनी मौन बाळगले आहे.

Web Title: marathi news mumbai news Devendra Fadnavis Cabinet Narayan Rane