सुकाणू समितीचे पुन्हा आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

मुंबई : सरसकट कर्जमाफी, शेतीपूरक व्यवसाय, शैक्षणिक आणि सिंचनासंदर्भात काढण्यात आलेले कर्ज ही कर्जमाफीच्या निकषात बसवावे, यासह अन्य प्रश्न पुन्हा राज्य सरकारच्या विरोधात असहकार आंदोलन पुकारण्याचा इशारा शेतकरी सुकाणू समितीचे प्रतिनिधी अजित नवले यांनी दिला. 1 एक मार्चपासून राज्यात कोणताही शेतकरी सरकारी बॅंकांचे कर्ज फेडणार नाही. तसेच सरकारचे कोणतेही कर भरणार नसून विजेचे बिलही भरणार नसल्याचे नवले यांनी सांगितले. 

शेतकऱ्यांच्या विविधप्रश्नी शेतकरी सुकाणू समितीचे डॉ. अजित नवले, शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांच्यासह अन्य प्रतिनिधींनी आज मलबार हिल येथील सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन सरकारने देऊनही अनेक वेळा सरकार दरबारी खेटा माराव्या लागत आहेत. सरकारने केलेली 

कर्जमाफी फसवी असून अनेक गावात केवळ पाच ते सहा शेतकऱ्यांना तुटपुंजी कर्जमाफी मिळाली असल्याचा आरोप करत सरकारने 89 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा केलेला दावा खोटा असल्याची टीका त्यांनी केली.

तसेच कर्जमाफीच्या योजनेपासून अनेकांना वंचित ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे रघुनाथदादा पाटील यांनी आरोप केला. त्यामुळे 1 एक मार्चपासून राज्यात कोणताही शेतकरी सरकारी बॅंकांचे कर्ज फेडणार नाही. तसेच शासनाचे कोणतेही कर भरणार नसून विजेचे बिलही भरणार नसल्याचे शेतकरी नवले यांनी सांगितले.

Web Title: marathi news mumbai news Farmers Loan Waiver ajit navale