मुंबई अमली पदार्थांच्या विळख्यात 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 डिसेंबर 2017

मुंबई : राज्यात अमली पदार्थ तस्करीचे 14 हजार 590 गुन्हे दाखल असून, त्यापैकी 14 हजार 107 गुन्ह्यांची नोंद मुंबईत झाली आहे. यातून मुंबईला अमली पदार्थांचा विळखा पडल्याची धक्कादायक माहिती गुन्हे अन्वेषण विभागाच्या अहवालातून उघडकीस आली आहे. अमली पदार्थ तस्करीप्रकरणी राज्यात 662 जणांना अटक केली असून, त्यात 33 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. 

अमली पदार्थ तस्करांविरोधात मुंबई पोलिसांकडून सर्वाधिक कारवाई होत असल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अहवालात म्हटले आहे. मुंबईपाठोपाठ नवी मुंबईत 78, ठाण्यात 71 तर पुण्यात 63, नागपूर 59 गुन्हे दाखल आहेत. परदेशातून चोरट्या मार्गाने अमली पदार्थ भारतात आणले जातात. त्यानंतर स्थानिक तस्करांमार्फत अमली पदार्थांची विक्री होते. जम्मू, दिल्ली ते मुंबई, बंगळूरु असे तस्करांचे नेटवर्क आहे. तस्करांची मुंबईला सर्वाधिक पसंती आहे. 

राज्यात गांजा तस्करीचे प्रकार वाढले असून, जम्मू, कर्नाटक, दिल्ली मार्गे गांजा महाराष्ट्रात आणला जातो. गांजा तस्करीसाठी महिला आणि लहान मुलांचा वापर होतो. 2016 मध्ये राज्यात सहा हजार 957 हजार किलो गांजा जप्त केला होता. गांजा तस्करीचे प्रमाण 24.75 टक्‍क्‍यांनी वाढल्याचे अहवालात नमूद केले आहे. गांजापाठोपाठ "भांगे'चीही तस्करी वाढली आहे. भांग बनवणे आणि त्याची विक्री करणे तस्करांना सोपे असते. ते स्वस्तात मिळत असल्याने अनेक नशेबाज भांगेचे व्यसन करतात. तरुणांना मृत्यूच्या खाईत ओढणाऱ्या एमडीविरोधात पोलिसांकडून वारंवार कारवाई होत असल्याने एमडी तस्करीचे प्रमाण कमी झाले. 

  • गांजाच्या तस्करीत 485 जणांना अटक 
  • कोकेन तस्करीत 27 परदेशी नागरिकासह नऊ भारतीयांना अटक 
  • एमडीच्या तस्करीत 36 भारतीय तर सहा परदेशी नागरिक
Web Title: marathi news mumbai news mumbai drugs mumbai crime cbi report