सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर एक-दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मात्र, पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या रस्त्यावर वाहतूक सुरळीत आहे.

मुंबई : प्रजासत्ताक दिन, शनिवार आणि रविवार अशा सलग सुट्ट्या आल्याने असंख्य पर्यटक सहलीला निघाले आहेत. या असंख्य पर्यटकांमुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. याशिवाय खालापूर टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. 

मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर एक-दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मात्र, पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या रस्त्यावर वाहतूक सुरळीत आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुण्याकडे जाण्यासाठी अतिरिक्त सहा लेन सुरु करण्यात आल्या आहेत. याशिवाय मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर शेडुंग टोलनाक्यानजीक वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.  
 

Web Title: Marathi news mumbai news mumbai pune traffic jam on express way