नारायण राणेंसाठी विधानसभाच योग्य ः नितेश राणे 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 4 मार्च 2018

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी दिल्ली भेटीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर नारायण राणे हे राज्यसभेसाठी तयार असल्याची चर्चा आहे. मात्र नारायण राणे यांच्या हितचिंतकांना असे वाटते आहे, की त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात दीर्घकाळासाठी राहावे, महाराष्ट्राला नारायण राणेंसारख्या नेत्याची गरज आहे. आम्हाला त्यांना विधानसभेत बघायचे आहे, राज्यसभेत नाही. असे ट्विट आमदार नीतेश राणे यांनी केल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र यांच्यात दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर राणे यांना राज्यसभेवर पाठविले जाऊ शकते, अशाही चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र भाजपची ही ऑफर नारायण राणे यांना अमान्य असल्याचे दिसते.

नारायण राणेंचे पुत्र नीतेश राणे यांनी आज एक ट्विट करून आपली इच्छा व्यक्त केली. या ट्विटनंतर राणेंनी भाजपची राज्यसभेची ऑफर अमान्य असल्याची चर्चा आहे. भाजपकडून राज्यसभेची ऑफर असल्याचे नारायण राणे यांनीच काल स्पष्ट केले होते.

येत्या 23 मार्चला राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक होत आहे. संख्याबळाचा विचार केला, तर भाजपचे तीन उमेदवार राज्यसभेवर सहज निवडून येऊ शकतात. त्यापैकी एक जागा नारायण राणेंना द्यायची असा प्रयत्न भाजपतर्फे सुरू आहे. 

Web Title: marathi news mumbai news Narayan Rane Nitesh Rane