भुजबळ छोडो आंदोलन झाले पाहिजे: राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

आमचा विकास कारागृहात कोंडला गेला आहे. नाशिक जिल्ह्याकडे लक्ष देणारा नेता नाही, असे त्यांच्या समर्थकांनी राज ठाकरेंसमोर गाऱ्हाणे मांडले. भुजबळांना जामीन कधीच मिळायला हवा होता. आता भुजबळ छोडो आंदोलन झाले पाहीजे, असा सल्ला राज ठाकरेंनी भुजबळ समर्थकांना दिला.

मुंबई : छगन भुजबळ यांनी कधीच जामीन मिळायला हवा होता. आता भुजबळ जोडो नाही, तर भुजबळ छोडो आंदोलन झाले पाहिजे, असे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले.

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी कारागृहात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या मुक्ततेसाठी भुजबळ समर्थकांनी राज ठाकरे यांची आज भेट घेतली. आमदार जयंत जाधव, आमदार नरहरी जिरवा, माजी आमदार शिरीष कोतवाल, माजी खासदार देविदास पिंगळे, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकृष्ण सोनावणे, शहर अध्यक्ष अंबादास खैरे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट घेत आपले गाऱ्हाणे मांडले.

आमचा विकास कारागृहात कोंडला गेला आहे. नाशिक जिल्ह्याकडे लक्ष देणारा नेता नाही, असे त्यांच्या समर्थकांनी राज ठाकरेंसमोर गाऱ्हाणे मांडले. भुजबळांना जामीन कधीच मिळायला हवा होता. आता भुजबळ छोडो आंदोलन झाले पाहीजे, असा सल्ला राज ठाकरेंनी भुजबळ समर्थकांना दिला.

दोन वर्षांपासून सूडाच राजकारण चालू आहे. त्याचे बळी छगन भुजबळ आहेत. न्यायालयीन बाब त्यांच्या बाजूने भुजबळांच्या बाजूने आहे. तरी त्यांना जामीन मिळत नाही. आम्ही नाशिकमध्ये अन्याय पे चर्चा सुरू केली आहे. आम्ही सर्व पक्षीय लोकांना भेटतोय आणि विनंती करतोय. आम्ही मुख्यमंत्र्यांनाही भेटणार आहोत. राज ठाकरेंच्या भेटीतून आम्ही समाधानी आहोत, असे जयंत जाधव यांनी सांगितले.

Web Title: Marathi news Mumbai news Raj Thackeray Changan Bhujbal