दोन मोदी पळून गेले, तिसरा येऊन-जाऊन: संजय राऊत

वृत्तसंस्था
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

शिवसेनेने आज (शनिवार) आपले मुखपत्र 'सामना'तून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. निरव मोदी यांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गर्व्हनर करा, असा सल्ला दिला आहे.

मुंबई : पंजाब नॅशनल बँकेत गैरव्यवहार करणारे हिरे व्यापारी निरव मोदी यांच्यावरून शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य केले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ललित मोदी आणि निरव मोदी हे दोघे देश सोडून पळून गेले... तिसरा येऊन-जाऊन असतो, असे खोचक वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे.

शिवसेनेने यापूर्वीही अनेकवेळा भाजप आणि पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले आहे. शिवसेनेने आज (शनिवार) आपले मुखपत्र 'सामना'तून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. निरव मोदी यांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गर्व्हनर करा, असा सल्ला दिला आहे. संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटमुळे भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

शेलार यांनी ट्विट करत म्हटले आहे, की 'मोदी' या शब्दाचे यमक जुळवून टुकार काव्य प्रभादेवीच्या गल्लीत बसून काहींना सूचले. तेव्हाच कळले आता 'शिमगा' जवळ आलाय! तसा वर्षभरच यांचा शिमगाच असतो म्हणा! उगाच 'यमका'साठी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न कशाला करताय, तीच थुंकी आपल्या तोंडावर पडू नये म्हणजे झाले!!!

Web Title: Marathi news Mumbai news Sanjay Raut criticize Narendra Modi