कर्तृत्ववान महिलांचा ‘सकाळ’कडून होणार सन्मान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

मुंबई - नेतृत्वगुणांची चमक दाखवून स्वत:बरोबर समाजाचाही विकास करण्याची धमक असलेल्या आणि त्यासाठी अवघड आव्हानांवर मात करणाऱ्या महिलांचा सन्मान ‘सकाळ माध्यम समूह’ करणार आहे. विविध क्षेत्रांत कर्तृत्वाचा झेंडा फडकवणाऱ्या या महिलांना ‘सकाळ-वूमेन इम्पॅक्‍ट अवॉर्ड’ देण्यात येणार आहे.

हा फाॅर्म डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

मुंबई - नेतृत्वगुणांची चमक दाखवून स्वत:बरोबर समाजाचाही विकास करण्याची धमक असलेल्या आणि त्यासाठी अवघड आव्हानांवर मात करणाऱ्या महिलांचा सन्मान ‘सकाळ माध्यम समूह’ करणार आहे. विविध क्षेत्रांत कर्तृत्वाचा झेंडा फडकवणाऱ्या या महिलांना ‘सकाळ-वूमेन इम्पॅक्‍ट अवॉर्ड’ देण्यात येणार आहे.

हा फाॅर्म डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

सात वेगवेगळ्या विभागांसाठी हे पुरस्कार देण्यात येतील. कुटुंब आणि समाजाचे २१ व्या शतकातील प्रश्‍न सोडवण्यासाठी धडपडणाऱ्या मातेला ‘भारती पारितोषिका’ने गौरवण्यात येईल. लोककल्याण; तसेच दारिद्र्य निर्मूलनासाठी काम करणाऱ्या महिलेचा ‘शिक्षण पारितोषिक’ देऊन सन्मान करण्यात येईल. या महिलेने अर्थपूर्ण शिक्षण आणि कौशल्यवृद्धीसाठी दिलेल्या योगदानाचा या पुरस्कारासाठी विचार होईल. भू-वायू आणि जलप्रदूषण नियंत्रणासाठी काम करणाऱ्या महिलेला ‘जबाबदार वापर पारितोषिका’ने (रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन अवॉर्ड) गौरविण्यात येईल. प्रदूषण करू शकणाऱ्या गोष्टी टाळण्यासाठी किंवा त्यांचा जबाबदारीने वापर व्हावा यासाठी या महिलेने केलेले प्रयत्न त्यासाठी विचारात घेतले जातील.

भू-वायू आणि जलप्रदूषण; तसेच घातक विषारी रसायनांचा संपर्क कमी करणाऱ्या सेवा उत्पादनांच्या निर्मितीसाठी केलेल्या उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलेला ‘जबाबदार उत्पादन पारितोषिक’ (रिस्पॉन्सिबल प्रॉडक्‍शन अवॉर्ड) देण्यात येईल.

हा फाॅर्म डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

समाजाला भेडसावणाऱ्या मुद्द्यांच्या निराकरणासाठी; तसेच विकासासाठी मोठ्या प्रमाणावर सकारात्मक परिणाम घडवण्यासाठी केलेल्या नवोन्मेषी कामासाठी ‘नवोन्मेष किंवा स्टार्टअप पारितोषिक’ देण्यात येईल. 
कर्तृत्ववान महिलांचा ‘सकाळ’कडून होणार सन्मान नवोन्मेषाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्टार्टअपचाही या पुरस्कारासाठी विचार केला जाईल.

सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना खास पुरस्कार देण्यात येणार आहे. सुप्रशासन, स्मार्ट सिटी किंवा स्मार्ट व्हिलेज उभारण्यासाठी तिने दिलेल्या योगदानाचा त्यासाठी विचार होईल.

पर्यावरणाची हानी न करता ‘स्वच्छ’ ऊर्जेची निर्मिती करण्यासाठीही विशेष पुरस्कार दिला जाईल. निर्मितीबरोबरच स्वच्छ ऊर्जेच्या प्रसारासाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या महिलांसाठी हा पुरस्कार असेल. 
या पुरस्कारांसाठी २५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करणे अपेक्षित आहे. याबाबतची अधिक माहिती ‘सकाळ’च्या कार्यालयात मिळू शकेल. पुरस्कारासाठीचे अर्ज www.esakal.com वर उपलब्ध आहेत. भरलेले अर्ज womenimpact@esakal.com या ई-मेलवर पाठवावेत किंवा सोबतचा क्‍यूआर कोड स्कॅन केल्यास अर्ज उपलब्ध होऊ शकेल.
अधिक माहितीसाठी ८०९७३०२९२८ या नंबरवर संपर्क साधू शकता.

हा फाॅर्म डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

Web Title: marathi news mumbai news women sakal wwomen impact award honour