मुरूडमध्ये तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळले ; वैमानिक गंभीर

वृत्तसंस्था
शनिवार, 10 मार्च 2018

भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर मुरुडजवळील नांदगाव येथे कोसळले. हेलिकॉप्टर लँडिंग करत असताना हा अपघात आज (शनिवार) झाला. हे हेलिकॉप्टर गस्तीवर असल्याची माहिती मिळत असून, या अपघातात 4 जण जखमी झाले आहेत. यातील महिला वैमानिक गंभीर जखमी झाली असून, अन्य तिघे किरकोळ जखमी झाले आहेत. 

मुरड : भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर मुरुडजवळील नांदगाव येथे कोसळले. हेलिकॉप्टर लँडिंग करत असताना हा अपघात आज (शनिवार) झाला. हे हेलिकॉप्टर गस्तीवर असल्याची माहिती मिळत असून, या अपघातात 4 जण जखमी झाले आहेत. यातील महिला वैमानिक गंभीर जखमी झाली असून, अन्य तिघे किरकोळ जखमी झाले आहेत. 

तटरक्षक दलाचे हे हेलिकॉप्टर नेहमीप्रमाणे गस्तीवर जात होते. यादरम्यान या हेलिकॉप्टरला अपघात झाला. मात्र, हा अपघात नेमका कशामुळे झाला याबाबतची माहिती अद्याप समजू शकली नाही. या हेलिकॉप्टरने मुरुड येथील अगदांडा तटरक्षक दलाच्या तळावरून उड्डाण केल्याची माहिती मिळत आहे. या हेलिकॉप्टरमध्ये महिला वैमानिकासह तीन जण प्रवास करत होते. या अपघातात महिला वैमानिक गंभीररित्या जखमी झाल्या असून, त्यांना उपचारांसाठी नौदलाच्या हेलिकॉप्टरने मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. 

दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच मुरुडचे तहसीलदार उमेश पाटील घटनास्थळी पोहोचले असून, अपघाताची माहिती घेत आहेत. त्यांच्यासोबत भारतीय नौदलाचे एक पथकही मदतीसाठी नांदगावला पोहोचले आहे.

Web Title: Marathi News Murud News Coast Guard Helicopter Crashed 4 Injury