दोन हजार घरांचे वाटप ऑक्‍टोबरमध्ये - नितीन गडकरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

नागपूर - पंतप्रधान आवास योजनेतील दीड हजार आणि एसआरएची पाचशे अशा एकूण दोन हजार घरकुलांचे वाटप लाभार्थ्यांना ऑक्‍टोबर महिन्यात करण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. 

गडकरी यांनी शहरातील सर्व प्रकल्पांचा आढावा आज हॉटेल सेंटर पॉइंट येथे घेतला. या वेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, महापौर नंदा जिचकार, मनपातील सत्तापक्ष नेते संदीप जोशी, माजी महापौर प्रवीण दटके यांच्यासह महापालिका आयुक्त अश्‍विन मुद्‌गल, सुधार प्रन्यासचे सभापती दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.  

नागपूर - पंतप्रधान आवास योजनेतील दीड हजार आणि एसआरएची पाचशे अशा एकूण दोन हजार घरकुलांचे वाटप लाभार्थ्यांना ऑक्‍टोबर महिन्यात करण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. 

गडकरी यांनी शहरातील सर्व प्रकल्पांचा आढावा आज हॉटेल सेंटर पॉइंट येथे घेतला. या वेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, महापौर नंदा जिचकार, मनपातील सत्तापक्ष नेते संदीप जोशी, माजी महापौर प्रवीण दटके यांच्यासह महापालिका आयुक्त अश्‍विन मुद्‌गल, सुधार प्रन्यासचे सभापती दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.  

म्हैसेकर यांनी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत चार हजार ५४० घरे मंजूर झाल्याचे सांगितले. त्यापैकी तरोडी आणि वाठोडा येथे कामे सुरू आहेत. दीड ते दोन हजार घरांचे बांधकाम पाच महिन्यांत पूर्ण होईल. याशिवाय एसआरएची पाचशे घरे बांधून तयार असल्याचे सांगितले.  गडकरी यांनी लगेच ऑक्‍टोबर महिन्यात लाभार्थ्यांना घरकुल वाटपाचा कार्यक्रम ठरवण्याचे  निर्देश दिले. म्हैसेकर यांनी एकूण १३ प्रकल्प मंजूर असल्याचे सांगितले. मात्र, तांत्रिक कारणामुळे अद्याप निधी मंजूर झालेला नाही. प्रन्यासच्या निधीतून घरकुल उभारले जात असल्याचेही सांगितले. महापालिका आयुक्तांनी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ७१ हजार अर्ज आल्याचे सांगितले. त्याची प्राथमिक पडताळणीसुद्धा झाली. सुमारे हजार लाभार्थ्यांची याकरिता निवड होऊ शकते असे सांगितले. 

रस्त्यावर पार्किंग करणारे नातेवाइक आहेत  का?
शहराच्या रस्त्यांवर गाड्या पार्क केल्या जातात. महापालिका व वाहतूक पोलिस कुठलीच कारवाई करीत नाही. यामुळे नितीन गडकरी चांगलेच संतापले. महापौर व मनपा आयुक्तांकडे बघून त्यांनी रस्त्यावर गाड्या पार्क करणारे तुमचे नातेवाईक आहेत का, असा सवाल केला. पंधरवड्यात नवीन कायदा येत असून, अवैध पार्किंग करणाऱ्याला पाच हजार रुपये दंड व त्याचा फोटो काढणाऱ्याला पाचशे रुपये बक्षीस देण्यात येईल असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

कुंभारटोलीला रस्ताच नाही
धरमपेठ परिसरातील कुंभारटोली हटविण्यात आली. त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. चांगली घरकुल योजना त्यांना बांधून देण्यात आली. यास आठ वर्षे झाले असूनही घरकुलापर्यंत जाण्यासाठी रस्ताच दिलेला नाही. विजेचाही पुरवठा करण्यात आला नसल्याचे प्रवीण दटके यांनी सांगितले. पालकमंत्र्यांनी लगेच रस्ता व वीज उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन दिले. पूर्व नागपुरातील कुंभारटोली हटविण्यापूर्वी त्यांना जागा द्या नंतरच ती रिकामी करा, अन्यथा आमच्या घरावर मोर्चे येतील, अशी सूचना आमदार कृष्णा खोपडे यांनी केली.

क्रेझी कॅसलला दणका
मेट्रो रेल्वेच्या स्थानकासाठी अंबाझरी येथील क्रेझी कॅसलची सहा एकर जागा मेट्रोला देण्याचे निर्देश नितीन गडकरी यांनी दिले. सुधार प्रन्यासचे सभापती डॉ. दीपक म्हैसेकर यांनी  आर्बिट्रेशनचा निर्णय सांगितला. लीज २०१९ पर्यंत आहे. यामुळे कायदेशीर अडचणीत असल्याचे ते म्हणाले. गडकरी यांनी हल्दिराम फुड्‌सला आणि मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी आपसात बसून तोडगा काढण्यास सांगितले. न्यायालयात जायचे असेल, तर खुशाल जा. नागरिकांच्या सुविधेसाठी मेट्रो आहे. यामुळे ती कुठल्याही परिस्थितीत जागा घेतली जाईल. तुमचे आर्थिक नुकसान होऊ दिले जाणार नाही. मेट्रोच्या प्रकल्पात तेथेच चांगली सुसज्ज जागा दिली जाईल.  काय करायचे ते तुम्हीच ठरवा. न्यायालयाच्या बाहेर वाद सोडविल्यास उत्तम होईल, असे सांगून गडकरी यांनी क्रेझी कॅसल बंद करावेच लागेल असाही इशारा अप्रत्यक्षपणे दिला.

Web Title: marathi news nagpur news home distribution october nitin gadkari