राणेंवर राज्यसभेच्या उमेदवारीसाठी दबाव

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 8 मार्च 2018

मुंबई - महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांच्या भवितव्याची चर्चा शिगेला पोचली असून, भाजपकडून त्यांच्यावर राज्यसभेची उमेदवारी स्वीकारावी म्हणून दबाव वाढला आहे. राणे अजूनही मंत्रिपद मिळेल या आशेवर आहेत, म्हणून त्यांनीही आज अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उद्या (ता. ८) मुंबईत येणार आहेत. त्यामुळे निर्णय उद्या संध्याकाळ ते परवापर्यंत पुढे ढकलला आहे.

राज्यसभेवर जायचे की नाही, याचा निर्णय घेण्यासाठी राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीत चर्चा केली. इतर पक्षांतही जोरदार हालचाली सुरू आहेत. त्यानुसार दिल्लीत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. 

Web Title: marathi news narayan rane rajysabha maharashtra