संधी मिळताच सरकारला बाजूला करा : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 मार्च 2018

भुजबळांना डांबून ठेवल्याचा खेद 
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना तुरुंगात डांबून ठेवल्याचा खेद राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नोंदविला. मलिक यांनी सरकार जास्त काळ चालणार नाही या भीतीपोटी सरकारने भुजबळ यांना तुरुंगात ठेवल्याचे सांगितले. त्यांनी भुजबळांना न्यायालयात न्याय मिळेल असा आशावाद मांडला. तुरुंगातून भुजबळ योद्धे तुरुंगातून लढताहेत अन्‌ महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी सरकारला गुजरात देण्यास तयार असल्याची टीका आव्हाड यांनी केली. तसेच भुजबळ यांच्या प्रकृतीविषयी पक्षाध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र त्यांनी वाचून दाखविले. खासदार सुळे यांनी भुजबळांच्या आठवणींना उजाळा दिला. क्रांतीनगरीतील क्रांतिवीर असा भुजबळांचा उल्लेख करत मुंडे यांनी भाजपवर भुजबळांना डांबून ठेवल्याचे टीकास्त्र सोडले.

नाशिक : बळिराजावर आत्महत्या करण्याचे दिवस आणणाऱ्या सरकारला राहण्याचा अधिकार नाही, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे दिला. तसेच आता बस्सं झालं ! असेही खडेबोल सुनावत त्यांनी शेतकरी, महिला, तरुण, आदिवासी, दलित, ओबीसी, गरिबांना सन्मानाने जगण्यासाठी संधी मिळताच सरकारला खड्यासारखं बाजूला करत परिवर्तन करावे लागेल, असे आवाहन केले. 

हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर राष्ट्रवादीच्या सरकारविरोधातील उत्तर महाराष्ट्रामधील हल्लाबोल संघर्ष यात्रेच्या समारोप सभेत पवार बोलत होते. माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी मंत्री अनिल देशमुख, राजेश टोपे, दिलीप वळसे-पाटील, जितेंद्र आव्हाड, आमदार पंकज भुजबळ आदी उपस्थित होते.

शेतकरी कुटुंबातील कर्तृत्वानांवर आत्महत्येची वेळ आली आहे, याकडे लक्ष वेधत पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने दिलेल्या प्रतिज्ञापत्रात देशात वर्षाला 12 हजार शेतकरी आत्महत्या करतात, अशी माहिती दिल्याचे उपस्थितांना सांगितले. तसेच देशातील आत्महत्या दर वाढत असून, हे प्रमाण 42 टक्‍क्‍यांपर्यंत पोचल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, की खानदेशातील धर्मा पाटील यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या पत्नीला आत्महत्येचा विचार करावा लागत आहे हे दुर्दैवी आहे. ही सारी परिस्थिती पाहिल्यावर शेतकरी अस्वस्थ झाल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे शेतकऱ्यांना दुर्लक्षित करणाऱ्यांना सत्तेवरून दूर केल्याशिवाय राष्ट्रवादीचा हल्लाबोल स्वस्थ बसणार नाही. 

भुजबळांना डांबून ठेवल्याचा खेद 
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना तुरुंगात डांबून ठेवल्याचा खेद राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नोंदविला. मलिक यांनी सरकार जास्त काळ चालणार नाही या भीतीपोटी सरकारने भुजबळ यांना तुरुंगात ठेवल्याचे सांगितले. त्यांनी भुजबळांना न्यायालयात न्याय मिळेल असा आशावाद मांडला. तुरुंगातून भुजबळ योद्धे तुरुंगातून लढताहेत अन्‌ महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी सरकारला गुजरात देण्यास तयार असल्याची टीका आव्हाड यांनी केली. तसेच भुजबळ यांच्या प्रकृतीविषयी पक्षाध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र त्यांनी वाचून दाखविले. खासदार सुळे यांनी भुजबळांच्या आठवणींना उजाळा दिला. क्रांतीनगरीतील क्रांतिवीर असा भुजबळांचा उल्लेख करत मुंडे यांनी भाजपवर भुजबळांना डांबून ठेवल्याचे टीकास्त्र सोडले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi news Nashik news Sharad Pawar criticize government