नीट, जेईई आणि सीईटीसाठी महाराष्ट्र बोर्डाची प्रश्‍नपेढी 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 31 जानेवारी 2018

मुंबई - नीट, जेईई आणि सीईटी परीक्षांमध्ये राज्यातील मुलांची तयारी करून घेण्यासाठी अखेर राज्य बोर्डाने आपली योजना मंगळवारी जाहीर केली. या परीक्षांच्या सरावासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रश्‍नपेढी तयार केली आहे. 

ही प्रश्‍नपेढी बोर्डाच्या www.mahahscboard.maharashtra.gov.in संकेतस्थळावर आहे. अकरावीच्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित आणि संख्याशास्त्र या विज्ञानाशी संबंधित विषयाच्या नमुना प्रश्‍नपत्रिका आणि नमुना उत्तरपत्रिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या प्रश्‍नपेढीचा आधार घेत नीट, जेईई आणि सीईटी परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने करता येईल, असा विश्‍वास बोर्डाने व्यक्त केला आहे. राज्यातील विविध भागांतील शिक्षकांनी अभ्यासपूर्ण आणि वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्‍न तयार केले असून, या प्रश्‍नांचे तज्ज्ञांनी परीक्षण केल्यानंतर ते प्रश्‍नपेढीत समाविष्ट करण्यात आले आहेत, अशी माहिती बोर्डाने दिली. ही प्रश्‍नपेढी केवळ बारावीच्या विद्यार्थ्यांनाही याच विषयासाठी नमुना प्रश्‍नपेढी बोर्डाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. 

Web Title: marathi news Neet JEE CET maharashtra board exam