प्रसादाऐवजी कडूनिंबाचं रोप; महाराष्ट्रातील एका मोठ्या मंदिराचा उत्तम निर्णय

सचिन अग्रवाल, अहमदनगर
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

  • शनिशिंगणापूर मंदिरात आता मिळणार कडूनिंब रोप
  • प्रसादाऐवजी कडूनिंबाचं रोप वाटण्याचा निर्णय
  • पर्यावरणाच्या रक्षणासाठी शनिशिंगणापूर देवस्थान सरसावलं

कोणत्याही मंदिरात गेल्यानंतर तुमच्या हातात प्रसाद मिळतोच. मात्र शनिशिंगणापूर मंदिरानं प्रसादासंबंधी एक अनोखा निर्णय घेतलाय. शनी शिंगणापूर मंदिरात येणाऱ्या भाविकांना आता कडूनिंबाचं रोपटं देण्यात येतंय. भाविकांनी अधिकाधिक वृक्षारोपण करावं आणि पर्यावरणाचं रक्षण करावं, असा देवस्थानाचा उद्देश आहे.

शनिशिंगणापूर मंदिरात दररोज सुमारे ४० हजार भक्तांची दर्शनासाठी गर्दी होते. प्रसादात बर्फीऐवजी लिंबाचं रोप दिलं, आणि येणाऱ्या एकूण भाविकांपैकी १० टक्के भाविकांनी जरी झाडं लावली, तर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण होईल, पर्यावरणाचं रक्षण होईल हे निश्चित.

 

Image By - tripadvisor.com

 

 

शनिशिंगणापूर देवस्थानाच्या या निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत होतंय.

WebTitle : marathi news now get neem plant as prasadam in shanishingnapur temple


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news now get neem plant as prasadam in shanishingnapur temple