निधीअभावी अंगणवाड्यांचे पोषण बिघडले - पंकजा मुंडे

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 8 मार्च 2018

राज्यातील अंगणवाडीतील बालके आणि गर्भवतींच्या पोषण आहारासाठी राज्याच्या वित्त विभागाने पुरेसा निधी दिला नसल्याने मागील काही दिवसांपासून पोषण आहार बंद करण्यात आल्याची धक्कादायक माहिती महिला व बाल कल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. 

आता पुरवणी मागण्यांमध्ये ४०० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली असली, तरी निधीची तरतूद करण्यात आली नाही. मार्चअखेरपर्यंत ५२२ कोटी रुपये मिळण्याची शक्‍यता असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, पंकजा मुंडे यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला.

विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी अंगणवाडीतील बालके आणि गर्भवतींना पोषण आहार बंद करण्यात आल्याने कुपोषणाचे प्रमाण वाढल्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला. 

त्यावरील चर्चेला उत्तर देताना पंकजा मुंडे म्हणाल्या, की अंगणवाडीतील बालकांना आणि गर्भवती महिलांना पोषण आहार मिळावा, यासाठी महिला बचत गटांद्वारे डाळ, तांदूळ, रवा, तेल आदी शिधापुरवठा करण्यात येत होता. त्यासाठी निधी मिळाला नसल्याने उधारीवर किराणा माल देणे दुकानदारांनी बंद केल्याने मागील आठ महिन्यांपासून पोषण आहार बंद आहे.

Web Title: marathi news Pankaja Munde fund anganwadi maharashtra Budget session