न्यायालयीन समन्सवाटप आता पोस्टमनमार्फत 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

मुंबई - फौजदारी खटल्यांचा जलदगतीने निकाल लागावा यासाठी आता न्यायालयाकडून बजावल्या जाणाऱ्या समन्सचे वाटप पोस्टमनमार्फत करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाला आज देण्यात आली. 

धनादेश न वटल्यासंबंधीच्या हजारो प्रलंबित दाव्यांची सुनावणी केवळ समन्स वेळेत पोचत नसल्यामुळे रखडली आहे, असे निदर्शनास आणणारी जनहित याचिका न्यायालयात करण्यात आली आहे. या याचिकेमध्ये आज राज्य सरकारच्या वतीने प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले. गृह विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच टपाल विभागाच्या अधिकाऱ्यांशी यासंबंधी एक बैठक घेतली होती. त्यानुसार संबंधित निर्णय अंतिम टप्प्यात आलेला आहे, असे प्रतिज्ञापत्रात सांगण्यात आले आहे. समन्स बजाविण्यासाठी सर्वसाधारणपणे पोलिस विभागाची मदत घेतली जाते; मात्र अपुऱ्या पोलिस बळामुळे अनेक समन्स रखडतात आणि त्यांची सुनावणीही थांबून राहते. तसेच साक्षीदारांनाही समन्स वेळेत बजावले न गेल्यामुळेही खटल्याचे कामकाज प्रलंबित असते, असे याचिकादारांनी निदर्शनास आणलेले आहे.

Web Title: marathi news postman Judicial summons high court