सरकार, प्रकाश आंबेडकरांना नोटीस बजावणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 मार्च 2018

मुंबई - कोरेगाव भीमामधील दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रात पुकारण्यात आलेल्या बंदच्या विरोधातील जनहित याचिकेमध्ये राज्य सरकार आणि दलित नेते प्रकाश आंबेडकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने नोटीस बजावण्याचे निर्देश दिले.

काही दिवसांपूर्वी मुंबईसह राज्यभर बंद पुकारण्यात आला होता. या बंदच्या विरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. नागरिकांना वेठीस धरून बंद पुकारणे गैर असल्यामुळे बंद पुकारणाऱ्या संघटनांकडून झालेले सार्वजनिक नुकसान वसूल करावे, अशी मागणी याचिकादारांनी केली आहे. याचिकेवर आज न्या. शंतनू केमकर व न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. न्यायालयाने सरकारसह भारिप महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर व अन्य संबंधित संघटनांनाही नोटीस बजावली आहे. चार आठवड्यांत लेखी खुलासा करण्याचे निर्देशही दिले आहेत. राज्य सरकारने नुकसानीबाबत अहवाल तयार केला असून, संबंधितांवर कारवाई सुरू केली आहे, असा दावा सरकारच्या वतीने ॲड. हितेन वेणेगावकर यांनी केला. पोलिसांनी सुमारे ७४ फौजदारी तक्रारी दाखल केल्याचे सांगितले.

Web Title: marathi news prakash medhekar government Koregaon Bhima riots