"राफेल' घोटाळ्यामुळे नरेंद्र मोदी देशाचे नव्हे अंबानीचे पंतप्रधान: प्रियंका चतुर्वेदी

residentional photo
residentional photo

नाशिक  : पंतप्रधान नरेंद्र मोदी "राफेल' करारात देशातील सर्वात मोठा चाळीस हजार कोटींचा घोटाळा केला. त्यासाठी माध्यमे, जनता व संसदेत माहिती लपवली. यातुन "एचएएल' हा  सरकारी उद्योग संकटात टाकला. उत्पादनात अनुभवहीन रिलायन्स या खासगी उद्योगाला लाभ पोहोचवला. देशहीतासाठी कॉंग्रेस संसद, रस्त्यावर व न्यायालयातही पुर्ण ताकदीनीशी लढा देऊन त्यांना उघडे पाडील असे अखिल भारतीय कॉंग्रेसच्या प्रवक्‍त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी पत्रकार परिषदेत सांगीतला. 

राफेल घोटाळ्याविषयी एनडीए सरकार विरोधात कॉंग्रेसने मोहीम उघडली आहे. त्यासाठी देशभर पत्रकार परिषदा घेऊन त्याची माहिती दिली जात आहे. त्यासंदर्भात चतुर्वेदी यांनी या प्रकरणात नरेंद्र मोदींचे सरकार सर्व शक्ती घोटाळ्यावर पांघरुन घालण्यात खर्च करीत आहेत. ते चौकीदार नव्हे तर भ्रष्टाचाराचे संरक्षक बनलेत. 

त्या म्हणाल्या, राफेल विमान खरेदी व्यवहारात विमानांची किंमत 560 कोटींवरुन 1760 व संख्या 126 वरुन 36 झाली. यात देशाची संरक्षण सिध्दता संकटात टाकली. पंतप्रधान मोदी, संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन व्यवहार गोपनीय आहे असे सांगीतले. मात्र प्रश्‍नोत्तरात संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी ही किमत सांगीतली आहे. रिलायन्सच्या वार्षिक अहवालात, "राफेल'च्या अहवालात त्याचा तपशील उपलब्ध आहे. मग कोणाच्या फायद्यासाठी माहिती लपवत आहेत? याचे उत्तर देशाला द्यावे. 

पंतप्रधान मोदींनी "राफेल' व्यवहारात अनिल अंबानीच्या मित्रप्रेमापोटी देशाची संरक्षण सिध्दता संकटात आणली. सर्वात मोठा भ्रष्टाचार केला. "भाजप'च्या सरकारने पंचेचाळीस हजार कोटींच्या तोट्यात असलेल्या उद्योगपती मित्र अनिल अंबानींना करदात्यांचे चाळीस हजार कोटींचा लाभ पोहोचविला. देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा घोटाळा आहे असा आरोप चतुर्वेदी यांनी केला. 

गडकरी, फडणवीसही घोटाळ्यात 
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याच खरेदीशी संबंधीत रिलायन्स डिफेन्स प्रकल्पाची नागपुरला पाहणी करतात. एकप्रकारे राफेल घोटाळ्याला हातभार लावत आहेत. ते देशातील एचएएल प्रकल्प व त्यातील हजारो कर्मचाऱ्यांच्या भवितव्य संकटात टाकत आहेत असा आरोप अखिल भारतीय कॉंग्रेसच्या प्रवक्‍त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी केला. 

अब्रुनकसानीची नोटीस अन्‌ अंबांनींची पत! 
अनिल अंबानींनी कॉंग्रेसच्या नऊ प्रवक्‍त्यांना पाच हजार कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस दिली आहे. याबाबत त्या म्हणाल्या, एकीकडे अंबानी म्हणतात आमचा संबंध नाही. दुसरीकडे त्यांच्याच अहवालात देशातील सर्वात मोठे राफेलचे कंत्राट आपल्याला मिळाले अशी माहिती देतात. वस्तुतः ते पंचेचाळीस हजार कोटींचे थकबाकीदार आहेत. मग त्यांची पत तरी काय समजावी असा प्रश्‍न चतुर्वेदी यांनी केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com