सुट्ट्यांसाठी कोकणात निघालात? सावकाशच जा! वाहतूक संथ सुरू आहे

महेंद्र शिंदे
शनिवार, 23 डिसेंबर 2017

खेड-शिवापूर : सलग आलेल्या सुट्ट्या आणि ख्रिसमस साजरा करण्यासाठी नागरीक मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत. त्यामुळे पुणे-सातारा महामार्गावर खेड-शिवापूर टोलनाक्यावर शनिवारी सकाळपासूनच वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

शनिवार, रविवार आणि ख्रिसमस सणाच्या सलग आलेल्या सुट्टयांमुळे नागरीक महाबळेश्वर, कोकण, गोवा आदी ठिकाणी जाण्यासाठी बाहेर पडले. त्यामुळे शनिवारी सकाळपासूनच पुणे-सातारा महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. खेड-शिवापूर टोल नाक्यावर सकाळपासून वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

वाहनांची संख्या इतकी जास्त आहे की साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी असलेल्या टोलच्या दहा लेनही कमी पड़त आहेत. त्यासाठी टोल प्रशासनाने पाच टोल मशीन उपलब्ध केल्या आहेत. राजगड पोलिस टोल नाक्यावर वाहतूक नियंत्रित करण्याचे काम करत आहेत. 

वीस टक्के वाहनांची संख्या जास्त
पुणे-सातारा महामार्गावर दररोज जाणाऱ्या वाहनांच्या तुलनेत विस टक्के वाहनांची संख्या जास्त असल्याचे टोल प्रशासनाने सांगितले. त्यातही कार गाड्यांची संख्या जास्त आहे. जास्त वहाने मुंबईची असून महाबळेश्वरला जाणाऱ्यांची संख्या जास्त असल्याचे टोल प्रशासनाने सांगितले.

सलग सुट्यांमुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

Web Title: marathi news Pune News Mumbai Goa Highway traffic Christmas Vacations