'सीए' परीक्षेत तुम्ही नक्की पास झालात की नापास? 

शुक्रवार, 19 जानेवारी 2018

मुंबई : देशभरातील सनदी लेखापालांसाठी (सीए) घेतलेला परीक्षेच्या निकालाच्या दोन याद्यांमधील तफावतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. अधिकृतरित्या जाहीर झालेल्या यादीमध्ये नापास असलेले विद्यार्थी पहिल्या यादीमध्ये मात्र पास झाल्याचा अजब प्रकार उघडकीस येत आहे. मात्र, अधिकृत यादीत 'नापास' हाच शिक्का कायम राहिला आहे. 

सनदी लेखापाल परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. त्यानंतर काल (गुरुवार) पात्र विद्यार्थ्यांची 'पीडीएफ' स्वरूपातील पहिली यादी सोशल मीडियातून सर्वत्र पसरली. ही यादी आणि 'आयसीएआय'ने जाहीर केलेल्या यादीमध्ये तफावत असल्याचे आढळून आल्यानंतर विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. अधिकृत यादीत नापास असलेले विद्यार्थी या पहिल्या यादीमध्ये पास असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. 

या गोंधळाच्या वातावरणानंतर 'आयसीएआय'ने एक पत्रक प्रसिद्ध केले. 'आम्ही जाहीर केलेल्या निकालामध्ये कोणतीही चूक झालेली नाही' अशी भूमिका या पत्रकाद्वारे घेण्यात आली आहे. 'अंतिम परीक्षेच्या एका किंवा दोन्ही ग्रुपमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांची यादी त्यांच्या गुणांशिवाय 'आयसीएआय'च्या विविध शाखांना पाठविली जाते. ही यादी त्यांच्या अंतर्गत माहितीसाठी असते. या यादीमध्ये काही त्रुटी असल्याचे निदर्शनास आणण्यात आले. यानंतर 'आयसीएआय'ने लगेच सुधारित यादी सर्व शाखांना पाठविली', असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. 'केवळ अंतर्गत माहितीसाठी असलेली ही यादी चुकून बाहेर प्रसिद्ध झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे हे स्पष्टीकरण देण्यात येत आहे' असेही त्यात शेवटी म्हटले आहे. 

यासंदर्भात 'ट्विटर'वर अनेक विद्यार्थ्यांनी शंका उपस्थित केल्या आहेत. सुरवातीच्या घोषणेनुसार, हा निकाल दुपारी जाहीर होणार होता. त्यानंतर निकाल रात्री आठ वाजता जाहीर होईल, असे सांगण्यात आले. या दरम्यान हा यादीचा गोंधळ झाल्याचा संशय विद्यार्थ्यांना आहे.

Web Title: marathi news Pune News Mumbai News CA Finals Results ICAI