पुण्याच्या श्रुती श्रीखंडेची 'सीडीएस' परीक्षेत बाजी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

पुणे : ‘कंम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस’ (सीडीएस) या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. यात पुण्याच्या श्रुती विनोद श्रीखंडे हीने बाजी मारली असून मुलींमध्ये देशात पहिली आली आहे. श्रुतीने पुण्यातून लॉमध्ये शिक्षण घेतले असून ती ब्रिगेडियर विनोद श्रीखंडे यांची कन्या आहे. 

‘कंम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस’ (सीडीएस) या परीक्षेत तोंडी आणि लेखी परीक्षेचा समावेश असतो. देशभरातील फक्त 232 विद्यार्थीच या परीक्षेसाठी पात्र ठरले होते. सीडीएसमध्ये लेखी परीक्षा व मुलाखत या दोन टप्प्यांसोबतच शारीरिक क्षमता हाही घटक पात्र ठरण्यास अत्यंत महत्त्वाचा असतो. यात यश मिळवल्याने श्रुतीचे विशेष कौतुक होत आहे. यापुढील प्रशिक्षणासाठी चेन्नईतील अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनीमध्ये (ओटीए) तिला प्रवेश मिळणार आहे. एप्रिल 2018 पासून तिच्या प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे. 

Web Title: Marathi news pune news qualify in cds exam

टॅग्स