सलमानच्या 'द-बॅंग द टूर'ची उत्सुकता

Salman Khan Dabangg tour
Salman Khan Dabangg tour

पुणे : तरुणाईचे आयकॉन असणारा "बजरंगी भाईजान' सलमान आणि त्याच्या बॉलिवूड पलटणीचे आता लक्ष्य आहे, पुणे! बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्री कतरिना कैफ, सोनाक्षी सिन्हा, सुप्रसिद्ध कोरिओग्राफर प्रभुदेवा, डेझी शाह, गुरू रंधवा आणि मनीष पॉल आदी कलावंतांचा सहभाग असणारी सलमानची 'द- बॅंग द टूर'  ही लाईव्ह कॉन्सर्ट 24 मार्चला (शनिवार) पुण्यात होते आहे. 

सोहेल खान यांनी दिग्दर्शित केलेली ही कॉन्सर्ट "फोर पिलर्स इव्हेंट्‌स', "18 डिग्रीज' आणि "निर्माण ग्रुप'ने "सकाळ माध्यम समूहा'च्या सहयोगाने ही कॉन्सर्ट आयोजित केली आहे. फिनोलेक्‍स केबल कॉन्सर्टचे सहप्रायोजक आहेत. 

गेल्या वर्षी सलमान खानच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या 'द- बॅंग द टूर' 'वर हॉंगकॉंग आणि ऑस्ट्रेलियातल्या ऑकलंड, मेलबर्नमधील लक्षावधी दर्शकांनी मोहर उठवली होती. त्यानंतर दिल्ली येथे झालेल्या शो लाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. 

प्रवेशिका येथे मिळतील... 
ticketexpress.in
बुक माय शो
पेटियम
इनसायडर.इन 
www.dabanggtourepune.com वर तिकिटे उपलब्ध असल्याचे संयोजकांकडून सांगण्यात आले. 

'द- बॅंग द टूर' 
कधी : 24 मार्च (शनिवार), सायं 7 वा. 
कोठे : छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, म्हाळुंगे- बालेवाडी 

पुणेकरांकडून मिळेल उत्तम प्रतिसाद : सोहेल खान 
तरुणाईची धडकन असलेला प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याचा "द- बॅंग द टूर' कॉन्सर्टच्या पुणे भेटीत सलमानसोबतच प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ, सोनाक्षी सिन्हा, प्रभुदेवा यांचे बहारदार नृत्यही पाहता येणार आहे. कार्यक्रमाची संहिता आणि दिग्दर्शन अभिनेता सोहेल खानचे आहे. 

या कार्यक्रमाविषयी बोलताना सोहेल म्हणाला, "पुणेकरांनी नेहमीच विविध कला आणि कलाकारांचा सन्मान केला आहे. आमच्या या कार्यक्रमाला विदेशात मिळालेल्या प्रतिसादापेक्षा उत्तम प्रतिसाद पुणेकरांकडून मिळेल याची मला खात्री आहे. साधारण अडीच तासांचा हा कार्यक्रम आहे. "द- बॅंग द टूर' कॉन्सर्टचा प्रत्येक शो वेगळा व नावीन्यपूर्ण असेल याची नेहमीच काळजी घेतो. या शोसाठी सलमान, सोनाक्षी, कतरीना, प्रभुदेवा आणि सगळ्याच कलाकारांनी खूप मेहनत घेतली आहे. त्यांचे सुंदर नृत्याविष्कार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. 

प्रश्‍न : सलमानच्या या लाईव्ह कॉन्सर्टचे वेगळेपण काय आहे 
सोहेल :
सलमान बरोबर "लाईव्ह कॉन्सर्ट' करायची हेच मोठे आव्हान आहे. त्यासाठी खूप कष्ट आणि समयसूचकता हवी. कार्यक्रमाला वेग पाहिजे, त्यासह मनोरंजनाही पाहिजे; म्हणून खूप सराव करावा लागतो. प्रत्येक शो मध्ये काही त्रुटी असतात. पण हे सगळे कलाकार इतके टॅलेंट आहेत की ते सहज सुधारतात. 
प्रश्‍न : "द-बॅंग द टूर'चे सर्वात मोठे आव्हान कोणते? 
उत्तर :
कार्यक्रमात सलमान सोबत कतरीना कैफ, सोनाक्षी सिन्हा, प्रभू देवा, डेझी शाह, गुरू रंधवा आणि मनीष पॉल यांचे सादरीकरण असणार आहे. प्रत्येक कलाकार प्रेक्षकांसोबत संवाद साधणार आहे. त्यामुळे कार्यक्रमाचा कलावधी साडेतीन तासांपर्यंत जाऊ शकतो. 
प्रश्‍न : "द-बॅंग द टूर'च्या संहितेचे वेगळेपण काय आहे? 
सोहेल :
ज्या वेळी आपण एखाद्या चित्रपट किंवा नाटकाची संहिता लिहितो तेव्हा काही गोष्टींचा अंदाज वर्तवितो. भविष्याचा वेध घेतो. मात्र "द-बॅंग द टूर'च्या संहितेत कलाकारांचा प्रवास भूतकाळाशी निगडित आहे. चित्रपटातील गाणी, नृत्य आणि संवादाशी निगडित आहेत. 
प्रश्‍न : "द-बॅंग द टूर'च्या पुण्यातील दौऱ्यात स्थानिक कलाकारांचा समावेश आहे का? 
सोहेल :
"द-बॅंग द टूर'मध्ये प्रेक्षकांच्या आवडीप्रमाणे स्थानिक भाषेची, संस्कृतीची अनुभूती यावी म्हणून स्थानिक कलाकारांचा विचार करण्यात येणार आहे. 
प्रश्‍न : "द-बॅंग द टूर'मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश आहे का? 
सोहेल :
"द-बॅंग द टूर'मध्ये भव्य एलईडी स्क्रीनसह अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत ध्वनी व प्रकाश योजना असून त्याला अनुरूप वेशभूषाही असेल. 

बॉडीगार्ड हे जबाबदारीचे क्षेत्र : शेरा 
बॉलिवूडमध्ये सलमान खानची ओळख दबंगस्टार अशी आहे, पण त्याच्या इतकेच ओळखीचे नाव म्हणजेच शेरा, म्हणजेच गुरमीत सिंग शेरा. शेरा म्हणजे "बजरंगी भाईजान' सलमान खानचा बॉडीगार्ड. गेल्या 21 वर्षांपासून तो सावलीसारखा त्याच्या सोबत आहे. शेरा ची स्वत:ची टायगर सिक्‍युरिटी सर्व्हिसेस नावाची कंपनी असून अनेक हॉलिवुड कलाकार व इव्हेंट्‌सला ही कंपनी सेवा पुरविते. "द-बॅंग द टूर'च्या पुण्यात होणाऱ्या कॉन्सर्टची घोषणा नुकतीच झाली. त्यानिमित्त शेरा सलमान बरोबर पुण्यात आला होता. 

शेराशी गप्पा मारताना प्रत्येकाचा पहिला साहजिक प्रश्‍न असतो, "सलमान सोबतचा प्रवास कसा वाटतो?' या प्रश्‍नावर शेरा म्हणतो, ""सलमान माझं दैवत आहे. त्याच्या सोबत गेली 21 वर्षे मी जग फिरलो आहे. हा प्रवास अविस्मरणीय आहे.'' 

या क्षेत्रात येण्याविषयी तो म्हणतो, ""सिक्‍युरिटी क्षेत्र आणि एखाद्याचा बॉडीगार्ड असणं ही खूप मोठी जबाबदारी आहे. प्रत्येक वेळी तुम्हाला ऍलर्ट राहावे लागते. मुख्य म्हणजे जेव्हा तुम्ही बॉडीगार्ड म्हणून काम करता त्या वेळी एकमेकांवरील विश्‍वास आणि परस्पर साहचर्य या दोन गोष्टी असणे गरजेचे असते. सुरवातीला बॉडीबिल्डिंग करीत होतो. माझा शेजारी व बालपणीचा जिवलग मित्र विस्टकोर्टमुळे या क्षेत्रात आलो. सुरवातीला हॉलिवूडमधील पिटर ऍन्ड्य्रू, मायकल जॅक्‍सन, जॅकी चेन सारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांना अंगरक्षक दिले. यासोबत हॉलिवूड आणि बॉलिवूडच्या अनेक इव्हेंट्‌स, मिस वर्ल्ड सारख्या कार्यक्रमात सुरक्षारक्षकांची सेवा दिली. सलमान भाईसोबत काम करत असल्याने या कामाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला. आता याची व्याप्ती वाढली असून अनेक संधीही उपलब्ध झाल्या आहेत. या क्षेत्रात येण्यासाठी खोलवर संशोधन व अभ्यास करण्याची तयारी हवी. त्याचबरोबर तुमची शारीरिक क्षमता, उच्च निर्णयक्षमता, हजरजबाबीपणाही महत्त्वाचा असतो. 

सलमानशी झालेल्या पहिल्या भेटीबद्दल शेरा सांगतो, सलमानला अंगरक्षकांची सेवा देण्यासंदर्भात आधी सोहेल बरोबर भेट झाली. त्यानंतर चंडीगडमध्ये सलमानच्या एका स्टेज परफॉर्मन्सच्या वेळी उत्तम कामगिरी केल्यानंतर सोहेलने टायगर सिक्‍युरिटी सेवा कायम ठेवली. 

सलमान खान विषयी बोलताना तो म्हणाला, ""सलमान चांगला माणूस आहे. त्याच्याकडे अफलातून ऊर्जा आहे. ही ऊर्जा म्हणजे मला सुपरनॅचरल वाटते. त्याची वृत्ती सेवाभावी. समाजसेवेच्या माध्यमातून तो गरीब व गरजूंना मदत करीत असतो. तो खूप संवेदनशील आणि चांगला माणूस आहे. त्याचासारखी व्यक्‍ती मी माझ्या आयुष्यात पाहिलेही नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com