आधीच खबरदारी घ्यायला हवी होती: शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जानेवारी 2018

भीमा कोरेगावला दरवर्षी लोक जात असतात. तेथे जाऊन आपली भावना व्यक्त करत असतात. आजपर्यंत कधीही तिथे स्थानिकांसोबत संघर्ष झालेला नाही. यावेळी २०० वर्ष झाल्यानिमित्त तिथे मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहतील, ही कल्पना होतीच. त्या ठिकाणी या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न काही प्रवृत्तीनी घेतला असावा. नांदेड जिल्ह्यातील एका तरूणाचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी याबाबतीत लगेच काळजी घेतली ते बरं झाले. नाहीतर त्याला जातीय स्वरुप आले असते.

मुंबई : वढु गावात काही हिदुंत्ववादी संघटना पुणे शहरातून येऊन चिथावणी देण्याचे काम करत असल्याचे तेथील ग्रामस्थ सांगत आहेत. पोलिसांनी केसेस दाखल केल्या आहेत. मात्र बाहेरून आलेले लोक करुन गेले आणि स्थानिक ग्रामस्थांवर केसेस दाखल केल्या अशी गावकऱ्यांची तक्रार आहे. त्यामुळे दोन तीन दिवस आधीपासूनच अस्वस्थेचे वातावरण होते. लाखांहून अधिक लोक जमा होणार असताना मला वाटतं आधीच खबरदारी घ्यायला हवी होती. ती न घेतल्यामुळेच आणि अफवा, गैरसमज अधिक पसरल्यामुळे हा प्रकार घडला आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

शरद पवार म्हणाले, ''भीमा कोरेगावला दरवर्षी लोक जात असतात. तेथे जाऊन आपली भावना व्यक्त करत असतात. आजपर्यंत कधीही तिथे स्थानिकांसोबत संघर्ष झालेला नाही. यावेळी २०० वर्ष झाल्यानिमित्त तिथे मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहतील, ही कल्पना होतीच. त्या ठिकाणी या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न काही प्रवृत्तीनी घेतला असावा. नांदेड जिल्ह्यातील एका तरूणाचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी याबाबतीत लगेच काळजी घेतली ते बरं झाले. नाहीतर त्याला जातीय स्वरुप आले असते. मृत्यूमुखी पडणारा कुणीही असो. पण हे प्रकरण चिघळू द्यायला पाहीजे नव्हते. जे घडले त्याची चौकशी राज्य सरकारने करावी. जे सार्वजनिक क्षेत्रात काम करतात त्यांनी हे पसरू न देण्याची भूमिका घ्यावी. घडलेला प्रकार शोभादायक नाही. यावर पुर्णविराम कसा पडेल. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील लोकांनी यात तेल न टाकता कोणतेही भाष्य करु नये, किंवा चर्चा करु नये. जे काही करायचे असेल ते सामंज्यस्याने करावे.''

वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील दोन गटांतील वाद शांत झालेला असताना विजयस्तंभ अभिवादन दिनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी दोन्ही गटांचे कार्यकर्ते कोरेगाव भीमा येथे समोरासमोर आले आणि घोषणाबाजी होऊन वाद चिघळला. त्याचे पर्यवसान दगडफेक, वाहने व मालमत्तेच्या जाळपोळीत झाले. पुणे-नगर रस्त्यावर कोरेगाव भीमा, वढू रस्ता, सणसवाडी, शिक्रापूर तसेच कोंढापुरी येथे अनेक वाहनांची तसेच रस्त्यावरील दुकानांची तोडफोड व जाळपोळ झाली. या घटनेत एक जण ठार, दोन जण गंभीर जखमी, तर काही जण किरकोळ जखमी झाले.

Web Title: Marathi news Pune news Sharad Pawar statement on Bhima Koregaon