बोचऱ्या टिकेचे राज ठाकरे यांनी साकारले व्यंगचित्र  

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 25 जानेवारी 2018

भाजप सोबत युती न करता लोकसभा-विधानसभा आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय काल (ता. 24 जानेवारी) शिवसेनेने राष्ट्रीय कार्यकारीणी बैठक आयोजित करुन घेतला. शिवसेना आणि भाजप यांच्यात आतापर्यंत युती जरी होती तरी त्यांचे सतत एकमेकांशी खटके उडत राहीले आहे. या दोन पक्षातील संघर्षावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक खास व्यंगचित्र बनविले आहे. राज यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन हे उपहासात्मक व्यंगचित्र प्रसिध्द केले.

चुकीच्या लोकांच्या हाती सत्ता गेली आहे. आम्हाला भेकड आणि भाकड राज्यकर्ते मान्य नाहीत, असे म्हणत राष्ट्रीय कार्यकारीणी बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्यावर कडकडून टिका केली होती. हे व्यंगचित्र शिवसेनेची स्वबळावर लढण्याची घोषणा हे नाटक आहे या अर्थाने रेखाटले आहे. उध्दव ठाकरे हे 'सत्ता सोडू का?' असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या पोटावर बसून विचारत आहे. या प्रश्नावर 'आम्ही कुठे धरलंय तुम्हाला!' असा टोला देत उत्तर देत आहेत. 

शिवसेनेने यापूर्वीही युतीतून विभक्त होण्याच्या डरकाळ्या फोडल्या आहेत. प्रत्यक्षात मात्र असेही काहीही शिवसेनेक डून झाले नाही. यामुळे शिवसेनेला सत्तेचे लालच असल्याचा आरोप मनसेसह अन्य विरोधी पक्षांनीही केला आहे.

Web Title: marathi news raj thakarey draw a caricature on shivsena and bjp