महसूल कर्मचारी मंगळवारपासून तीन दिवस संपावर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

नाशिकः महसूल कर्मचारी येत्या मंगळवार (ता. 7)पासून विविध मागण्यांसाठी तीन दिवस संपावर जात आहेत. संप यशस्वितेसाठी महसूल कर्मचारी संघटनांनी तयारी सुरू केली आहे. तीन दिवसांच्या संपाची दखल न घेतल्यास दोन महिन्यांनी बेमुदत संप करण्याचा इशारा दिला आहे. 

केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा. या प्रमुख मागण्यांसह संघटनांनी त्यांच्या इतरही प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाची हाक दिली आहे. राज्यातील शासकीय कार्यालयांतील रिक्त पदे भरली जावीत, अंशदायी निवृत्तिवेतन योजना रद्द करुन जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करावी. जानेवारी 2017 पासूनची महागाई भत्त्याची थकबाकी आणि जानेवारी 2018 पासूनचा वाढीव महागाई भत्ता फरकाच्या रकमेसह त्वरित मंजूर करावा या प्रमुख मागण्यांसाठी महसूल मध्यवर्ती संघटनांनी त्यांच्या मागण्या पुढे केल्या आहेत. चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेने चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना तृतीयश्रेणी पदोन्नतीत 25 टक्‍क्‍यांऐवजी 50 टक्के पदे पदोन्नतीने भरावीत. मात्र त्या वेळी चतुर्थश्रेणी कामगारांची मंजूर पदे निरस्त करू नये, अशी मागणी केली आहे. 
 
Web Title: marathi news revenue commissioner office

टॅग्स