औषधांच्या नैराश्याने  रॉय यांनी उचलले आत्महत्येचे पाऊल?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

नाशिक : अतिरिक्‍त पोलिस महासंचालक व एटीएसचे माजी प्रमुख हिमांशू रॉय यांना मूत्रपिंडाचा (किडनी) कर्करोग झाला होता. त्यासाठी त्यांनी मुंबईत तसेच अमेरीका, पोर्तुगाल देशात औषधोपचार घेतले होते. नोव्हेंबर 2016 पासून नाशिकमधील मानवता कॅन्सर हॉस्पिटलमध्ये सेंटर फॉर डिफीकल्ट कॅन्सर (सीडीसी)च्या माध्यमातून उपचार घेत होते. गेल्या सोमवारी (ता.30) काढलेल्या पेट सिटीस्कॅनमध्ये कर्करोग पूर्णपणे बरा झाल्याचे दिसत होते. मात्र उपचारादरम्यान वापरलेल्या औषधांच्या काही घटकामुळे आलेल्या नैराश्‍यामुळे त्यांची आत्महत्येचे पाऊल उचलल्याची शक्‍यता कर्करोग तज्ज्ञ डॉ. राज नगरकर यांनी व्यक्‍त केली आहे. 

नोव्हेंबर 2016च्या वैद्यकीय स्थितीनुसार हिमांशू रॉय अवघे दोन महिने जगतील, असे काही डॉक्‍टरांनी सांगितले होते. परंतु त्यानंतर सेंटर फॉर डिफीकल्ट कॅन्सरच्या माध्यमातून चाचण्या करून, त्यांच्या स्थितीवर कुठले औषधे त्यांच्यासाठी प्रभावी ठरू शकतील, याचा शोध घेण्यात आला. नंतरच्या उपचाराला चांगला प्रतिसाद लाभला होता.

गेल्या सोमवारी (ता.30) त्यांचा पेट सिटीस्कॅन काढल्यानंतर शरीरात कर्करोगाची एकही गाठ उरलेली नसल्याचे दिसत असतांना रक्‍ताच्या चाचण्यादेखील सामान्य होत्या. औषधोपचार बंद करण्याची स्थिती होती. मात्र अशक्‍तपणा आल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान घेतलेल्या गोळ्यांपैकी काही गोळ्यांतील घटकांमूळे त्यांच्या मनात नैराश्‍याची भावना निर्माण झाली असल्याची शक्‍यता आहे. हेच त्यांच्या आत्महत्येसाठी असून शकते असे सांगण्यात येत आहे. गेल्या दोन अडीच वर्षांत त्यांच्यावर नाशिक, पुणे येथे उपचार केले होते. 

अन्य कर्करोगग्रस्तांना 
रॉय देणार होते प्रोत्साहन 

कर्करोगाच्या उपचाराला प्रतिसाद मिळाल्याने हिमांशू रॉय पुन्हा पोलिस दलात सहभागी होण्याच्या तयारी होते, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. तसेच अंतीम टप्यातही कर्करोग बरा होऊ शकतो, असा संदेश देण्यासाठी मानवता कॅन्सर हॉस्पिटलतर्फे आयोजित कॅन्सर सर्वायव्हर्सच्या मेळाव्यात सहभागी होतांना हिमांशू रॉय कर्करोगग्रस्तांना प्रोत्साहन देणार होते. त्यातच त्यांनी आत्महत्या केल्याची बातमी धक्‍कादायक असल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले. 

काही दिवसांपूर्वीच हिमांशू रॉय यांच्या पेट सिटीस्कॅनसह रक्‍ताच्या चाचण्यांतून ते कर्करोगातून पूर्णपणे बरे झाल्याचे निष्पन्न होत होते. त्यांनी कर्करोगाचा सामना मोठ्या हिम्मतीने केला व सकारात्मक दृष्टीकोनातून औषधोपचाराला प्रतिसादही सकारात्मक मिळाला. मात्र उपचारादरम्यानच्या गोळ्यांतील काही घटकांमुळे त्यांना नैराश्‍याने ग्रासले असावे. यातून त्यांनी आत्महत्या करण्याची टोकाची भुमिका घेतली असल्याची शक्‍यता आहे. 
-डॉ.राज नगरकर, कर्करोग तज्ज्ञ. 

हिमांशू रॉय यांच्याशी दातार कुटुंबियांचे जवळचे संबंध होते. "सीडीसी'च्या माध्यमातून त्यांच्यावर गेल्या दोन वर्षांपासून उपचार सुरू होते. कालच त्यांच्याशी एसएमएसद्वारे तब्येती विषयी बोलणेदेखील झाले होते. पुन्हा पोलिस दलात दाखल होण्याचा त्यांचा विचार होता. पण आजच्या बातमीने मोठा धक्‍का बसला आहे. 
-स्नेहा दातार. 
 
Web Title: marathi news roy suicide

टॅग्स