आदर्श, श्रुती, कुणाल, आदित्य राज्यात प्रथम 

आदर्श, श्रुती, कुणाल, आदित्य राज्यात प्रथम 

पुणे - महाराष्ट्र आणि गोव्यातल्या विद्यार्थ्यांना कल्पनेच्या विश्‍वात रमून कल्पनेच्या पंखांनी उंच भरारी घेत रंग-रेषांच्या जादूई विश्‍वाची सफर घडविणाऱ्या पॉवर्ड बाय लव्ह इट चॉकलेट्‌स आणि एलआयसी "सकाळ चित्रकला स्पर्धा-2017'तील सर्वसाधारण विद्यार्थ्यांमध्ये "अ' गटात आदर्श रमण लोहार (गडहिंग्लज, जि. कोल्हापूर), "ब' गटात श्रुती वीरेंद्र गायकवाड (बारामती, जि. पुणे), "क' गटात कुणाल धनाजी खैरनार (उंब्रज, जि. पुणे) आणि "ड' गटात आदित्य संतोष गोरे (संगमनेर, जि. नगर) यांनी राज्य पातळीवर प्रथम क्रमांक पटकावला आहे. 

"सकाळ'च्या वाचकांच्या तीन पिढ्यांना जोडणाऱ्या आणि रंग-रेषांचे आकर्षक विश्‍व खुले करत उमलत्या पिढीला सर्जनशीलतेच्या वाटेवर अलगद घेऊन जाणाऱ्या उपक्रमाचे हे 32वे वर्ष होते. महाराष्ट्र व गोव्यातील दोन हजारांहून अधिक शाळांमध्ये गेल्या 17 डिसेंबरला एकाच वेळी ही स्पर्धा झाली होती. अन्य राज्ये आणि जगभरातल्या विद्यार्थ्यांनीही यंदाच्या स्पर्धेत ऑनलाइन सहभाग नोंदवला होता. महाराष्ट्र आणि गोव्यात मिळून साठहून अधिक आदिवासी आश्रमशाळा आणि पन्नासहून अधिक विशेष मुलांसाठीच्या शाळाही स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. 

यंदाच्या "पॉवर्ड बाय लव्ह इट चॉकलेट्‌स' आणि "एलआयसी' स्पर्धेसाठी श्री चैतन्य टेक्‍नो स्कूल आणि जिंगल टून्स सहप्रायोजक, भारताचे अग्रगण्य ऑप्टिशियन्स गंगर आयनेशन आयकेअर पार्टनर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पर्यावरण पार्टनर, तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कॉर्पोरेट पार्टनर होते. 

स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील विद्यार्थी चित्रकारांनी मिळून एकूण दहा लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची पारितोषिके जिंकली आहेत. 

इयत्ता पहिली ते दहावीच्या सर्वसाधारण आणि विशेष विद्यार्थ्यांसाठी चार गटांमध्ये या स्पर्धा झाल्या. विविध गटांतल्या स्पर्धकांसाठी "माझे घर', "माझे आवडते खेळणे', "माझी शाळा', "माझा मोबाईल', "मी पतंग उडवतो', "किल्ला', "खेळण्यांची दुनिया', "आइसक्रीमची दुनिया', "माझा आवडता सण', "जंगल', "रस्ता सुरक्षा', "भाजीवाला किंवा भाजी मंडई', "शाळेच्या प्रयोगशाळेत', "पावसातील दृश्‍य', "कॉम्प्युटर गेम' आणि "कॅम्प फायर किंवा शेकोटी' या विषयांबरोबर प्रायोजकांनी "वन लाइफ लव्ह ईट' असा विषय सर्व गटांसाठी सुचवलेला होता. 

राज्य पातळीवरील स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आणि विजेत्यांच्या चित्रांचे प्रदर्शन पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे तपशील लवकरच जाहीर केले जातील. राज्य स्तरावरील विजेत्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमार्फत कार्यक्रमाची निमंत्रणे पाठवली जातील. अन्य विजेत्या विद्यार्थ्यांची प्रशस्तिपत्रे आणि पारितोषिके त्यांच्या शाळांमध्ये लवकरच पाठवली जातील. 

(विशेष विद्यार्थ्यांच्या तसेच ऑनलाइन स्पर्धेचे राज्यस्तरीय निकाल उद्याच्या (बुधवार) अंकात. 

राज्यपातळी परीक्षक समिती 
राहुल देशपांडे व प्रीती गोटखिंडीकर (पुणे), हिरामण पाटील (मुंबई), सुरेंद्र झिरपे (औरंगाबाद), विजय टिपुगडे (कोल्हापूर), विलास जाधव (नाशिक), किशोर सोनटक्के (नागपूर), अरविंद कुडिया व प्रशांत शेकटकर (नगर), नागेश राव सरदेसाई (गोवा) आणि विशाल कुमावत (जळगाव). 

राज्यपातळी निकाल 

सर्वसाधारण विद्यार्थी 

"अ' गट 
प्रथम ः आदर्श रमण लोहार (2री, साधना विद्यालय, गडहिंग्लज जि. कोल्हापूर), द्वितीय ः अनुजा गोरावडे (1ली, मॉर्डन प्रायमरी इं.मि. स्कूल, शिवाजीनगर, पुणे), तृतीय ः आर्या मेश्राम (1ली, साऊथ वेस्ट कॉन्व्हेंट इं.मि. स्कूल, सोनगाव, मावळ, जि. पुणे), उत्तेजनार्थ ः सोहम नीलेश गवांदे (2री, जि.प.प्राथ. शाळा, पिंपळगाव (ब), निफाड, जि. नाशिक), राजवीर प्रतापराव गोसावी (2री, श्री शांतादुर्ग प्रायमरी स्कूल, बिचोलिम, गोवा), स्नेहा सचिन बागल (1ली, कोळा विद्यामंदिर इं.मि. स्कूल, कोळा, ता. सांगोला, जि. सोलापूर), राघव शेठ (2री, पोदार इंटरनॅशनल स्कूल, सातारा), आस्मी धरत (2री, डीएसआरव्ही स्कूल, गोरेगाव, मुंबई). 

"ब' गट 
प्रथम ः श्रुती वीरेंद्र गायकवाड (4थी, विद्या प्रतिष्ठान विनोदकुमार गुजर बालविकास मंदिर, बारामती, जि. पुणे), द्वितीय ः हर्षल देशमुख (4थी, अण्णासाहेब कल्याणी प्राथ. शाळा, सातारा), तृतीय ः चैतन्य रतन वाघ 4थी, के.डी. भालेराव इं.मि. स्कूल, सटाणा, जि. नाशिक), उत्तेजनार्थ ः दुर्वेश नंदकुमार सूर्यवंशी (4थी, स्वा.सै.शि.न. वाणी प्राथ.व उच्च माध्य. विद्यामंदिर, पिंपळनेर, जि. नाशिक), रुमाना सागिर सय्यद (3री, सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज, जि. सोलापूर), आकांक्षा सतीश खोपकर (4थी, मेरी मेमोरिअल स्कूल, नगर), अर्चित दिलीप जोंधळेकर (3री, एचएमपी हायस्कूल, डहाणू, जि. पालघर), हृदयांश खोलगडे (4थी, शाश्‍वत कन्सेप्ट स्कूल, अमरावती), यश महेश मोहिते (4थी आदर्श विद्यामंदिर, इचलकरंजी, जि. कोल्हापूर). 

"क' गट 
कुणाल धनाजी खैरनार (7वी, श्री महालक्ष्मी विद्यालय, उंब्रज नं. 1, ता. जुन्नर. जि. पुणे), द्वितीय ः स्वराज प्रशांत शेकटकर (7वी, भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल, नगर), तृतीय ः धृती नायक (7वी, डिव्हाइन प्रोव्हिडंट कॉन्व्हेंट हायस्कूल, बेळगाव), उत्तेजनार्थ ः रोशनी राजेंद्र बडगुजर (7वी, जनता हायस्कूल, शिंदखेडा, जि. धुळे), प्रतिमा अमित भारती (7वी, श्रीमती कमला नेहरू प्राथ. शाळा, जुळे सोलापूर), सिंचना नायर (7वी, बेथनी कॉन्व्हेंट हायस्कूल, गोवा), सृष्टी वासालवर (6वी, गांधी विद्यालय, परभणी), अनुष्का संजय सूर्यवंशी (6वी, न्यू एरा इंग्लिश स्कूल, नाशिक). 

"ड' गट 
प्रथम ः आदित्य संतोष गोरे (9वी, मा.रु.दा. मालपाणी विद्यालय, संगमनेर, जि. नगर), द्वितीय ः आर्यन रमण लोहार (8वी, साधना हायस्कूल, गडहिंग्लज, जि. कोल्हापूर), तृतीय ः प्रणाली मनाली विसावे (10वी, पंकज विद्यालय, चोपडा, जि. जळगाव), उत्तेजनार्थ ः वेदांत भास्कर लोहार (10वी, टिळक हायस्कूल, कराड, जि. सातारा), पंकज अरविंद कोंडेवार (9वी, शाहू गार्डन कॉन्व्हेंट हायस्कूल, नागपूर), कीर्ती रवींद्र बंदेवार (9वी, सावित्रीबाई फुले हायस्कूल, नांदेड), सूरज चौधरी (10वी, बेथनी कॉन्व्हेंट हायस्कूल, गोवा), गायत्री बाळासाहेब मोरे (9वी, पुंजाजी रामजी भोर विद्यालय, सिन्नर, जि. नाशिक), परबजित जसबीर सोधी (10वी, विद्यामंदिर, तारापूर, जि. पालघर). 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com