राज्यातील 288 आमदार बिनकामाचे: संभाजी भिडे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जानेवारी 2018

शिवरायांचे स्मारक उभारण्यावरून संभाजी भिडे यांनी राज्यातील सर्व आमदारांवर जोरदार टीका केली. शिवरायांच्या नावाचा वापर केवळ राजकारणासाठी केल्याचे वक्तव्य त्यांनी केली. तासगावात धारकऱयांची गडकोट मोहिमेसाठीच्या बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केले.

सांगली : आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर राज्यकर्त्यांनी आपल्या सोयीस्कर राजकारणानुसार केला. या लोकांना शिवरायांच्या विचारांशी, त्यांच्या कार्याशी देणे घेणे नाही. प्रतापगडाच्या कुशीत शिवरायांचे स्मारक व्हावे यासाठी सध्या कुणीच प्रयत्न करत नाही. त्यामुळे राज्यातील 288 आमदार हे जवळसपास बिनकामाचे आहेत, अशी सणसणीत टीका शिवप्रतिष्ठानचे संंभाजी भिडे यांनी केली आहे.

शिवरायांचे स्मारक उभारण्यावरून संभाजी भिडे यांनी राज्यातील सर्व आमदारांवर जोरदार टीका केली. शिवरायांच्या नावाचा वापर केवळ राजकारणासाठी केल्याचे वक्तव्य त्यांनी केली. तासगावात धारकऱयांची गडकोट मोहिमेसाठीच्या बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केले.

तासगावमध्ये शिवप्रतिष्ठानच्यावतीने गडकोट मोहिम व 32 मन सुवर्ण सिंहासन पूर्नस्थापना या विषयावर आयोजित बैठकीत भिडे बोलत होते. यावेळी भिडे यांनी भाजपचे खासदार संजय पाटील यांना देखील लक्ष्य केले. खासदार संजय पाटील हे मराठा आहेत पण ते कधीच म्हणाले नाहीत, की शिवरायांचे स्मारक व्हावे, यासाठी मी उपोषणाला बसेन. शिवरायांच्या नावाचा वापर करुन राजकारण केले जात आहे. आपला देश दहशतवाद, आतंकवाद यामध्ये सापडलेला आहे. मात्र तो आतंकवाद संपवण्यासाठी शिवरायांनी घालून दिलेली शिकवण आज कोणीच अंमलात आणत नाही. राज्यात शिवरायांचे हजारो पुतळे उभ केले आहेत, हे राज्यकर्त्यांचे केवळ नाटक आहे, असेही भिडे म्हणाले.

Web Title: Marathi news Sangli news Sambhaji Bhide statement on MLAs