शिर्डीतील साईबाबा मंदिर 31 डिसेंबरला रात्रभर खुले

Marathi news Shirdi Sai Baba temple to remain open on 31st December
Marathi news Shirdi Sai Baba temple to remain open on 31st December

शिर्डी : चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्‍वागतानिमित्‍त होणारी संभाव्‍य गर्दी लक्षात घेवून साईभक्‍तांसाठी ३१ डिसेंबर रोजी श्री साई समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्‍यात येणार आहे. 

सलग सुट्ट्यामुळे साईभक्‍तांची होणारी गर्दी लक्षात घेवून २४ डिसेंबर रोजी श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवल्‍यामुळे गेल्‍या दोन दिवसांत सुमारे दोन लाख साईभक्‍तांनी श्रींच्‍या समाधीच्‍या दर्शनाचा लाभ घेतला असल्‍याची माहिती श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांनी दिली.

श्रींच्‍या दर्शनाचा लाभ भाविकांना व्‍हावा याकरीता ३१ डिसेंबर रोजी समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले राहिल. ३१ डिसेंबर रोजी रात्री १०.३० वाजता होणारी शेजारती व १ जानेवारी २०१८ रोजीची काकड आरती होणार नाही. १ जानेवारीला संस्‍थानमार्फत दैनंदिन साईभक्‍तांकरीता आयोजित केलेल्‍या श्री साईसत्‍यव्रत पूजा, अभिषेक पूजा व वाहनांची पूजा बंद राहणार असल्‍याचे ही श्रीमती अग्रवाल यांनी सांगितले. 

त्या म्‍हणाल्‍या, नाताळ सुट्टी व शनिवार आणि रविवार या सलग जोडून आलेल्‍या सुट्टयाच्‍या याकालावधीत शिर्डीत लाखो भाविक श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेण्‍यासाठी येणार असल्‍याची बाब लक्षात घेवून संस्‍थान २४ डिसेंबरला समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्‍याचा निर्णय घेतला होता.

दोन दिवसांत...

  • २४ व २५ डिसेंबर या दोन दिवसात सुमारे दोन लाख भाविकांनी श्री साईबाबांच्‍या समाधीच्‍या दर्शनाचा लाभ घेतला.
  • दर्शनरांगेतुन सुमारे दोन लाख साईभक्‍तांनी मोफत बुंदी प्रसाद पाकीटाचा लाभ घेतला.
  • श्री साईप्रसादालयात १ लाख ४० हजार साईभक्‍तांनी प्रसादभोजनाचा लाभ घेतला.
  • प्रसाद म्‍हणून सुमारे १ लाख ३५ हजार लाडू प्रसाद पाकीटांचा लाभ घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com